हिंगोली : ‘लोकमत’, ‘लोकमत समाचार’ आणि साधु वासवानी मिशन पुणे यांच्या वतीने मोफत कृत्रिम हात व पाय (जयपूर फूट) वितरण शिबीर रविवार, १४ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हिंगोली शहरातील कल्याण मंडपम् येथे आयोजित करण्यात आले आहे.या शिबिराचे उद्घाटक खा.राजीव सातव तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अनिल भंडारी, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांची उपस्थिती राहणार आहे.या शिबिराचे आयोजन साधू वासवानी मिशन, पुणे करीत आहे. या शिबिराअंतर्गत १५ आॅक्टोबर २0१७ रोजी कृत्रिम अवयवांसाठी पात्र ठरलेल्या गरजूंच्या अवयवांचे माप घेण्यात आले होते. त्यानुसार हे अवयव तयार करण्यात आले असून, त्यांच्या वितरणाबरोबर हे शिबीर समाप्त होईल.या शिबिराचे आयोजन लोकमत, लोकमत समाचार, साधु वासवानी मिशन पुणे, हिंगोली बैडमिंटन क्लब, आणि पंकज अग्रवाल यांच्या सहकार्याने झाले आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.माप दिलेल्यांनाच मिळतील अवयव...४१४ जानेवारी रोजी कृत्रिम हात व पाय वितरित केले जातील. याचा लाभ लाभार्थिंनी उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन शिबिराच्या संयोजकांनी केले आहे. शिबिरात ज्यांचे कृत्रिम अवयवासाठी माप घेण्यात आले होते, त्यांनाच ते आता वितरित केले जातील. आता या शिबिरात कोणत्याही व्यक्तीचे माप घेतले जाणार नाही.
कृत्रिम हात व पाय वितरण शिबीर आजहिंगोली : ‘लोकमत’, ‘लोकमत समाचार’ आणि साधु वासवानी मिशन पुणे यांच्या वतीने मोफत कृत्रिम हात व पाय (जयपूर फूट) वितरण शिबीर रविवार, १४ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हिंगोली शहरातील कल्याण मंडपम् येथे आयोजित करण्यात आले आहे.या शिबिराचे उद्घाटक खा.राजीव सातव तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अनिल भंडारी, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांची उपस्थिती राहणार आहे.या शिबिराचे आयोजन साधू वासवानी मिशन, पुणे करीत आहे. या शिबिराअंतर्गत १५ आॅक्टोबर २0१७ रोजी कृत्रिम अवयवांसाठी पात्र ठरलेल्या गरजूंच्या अवयवांचे माप घेण्यात आले होते. त्यानुसार हे अवयव तयार करण्यात आले असून, त्यांच्या वितरणाबरोबर हे शिबीर समाप्त होईल.या शिबिराचे आयोजन लोकमत, लोकमत समाचार, साधु वासवानी मिशन पुणे, हिंगोली बैडमिंटन क्लब, आणि पंकज अग्रवाल यांच्या सहकार्याने झाले आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.माप दिलेल्यांनाच मिळतील अवयव...४१४ जानेवारी रोजी कृत्रिम हात व पाय वितरित केले जातील. याचा लाभ लाभार्थिंनी उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन शिबिराच्या संयोजकांनी केले आहे. शिबिरात ज्यांचे कृत्रिम अवयवासाठी माप घेण्यात आले होते, त्यांनाच ते आता वितरित केले जातील. आता या शिबिरात कोणत्याही व्यक्तीचे माप घेतले जाणार नाही.