लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्टÑात सांगलीनंतर हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समितीध्ये हळदीची आवक आहे. यामध्ये वसमत येथील बाजार समितीचाही समावेश आहे. दोन्हीही ठिकाणी हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर शुक्रवारी हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साडे चार हजार क्विंटल हळदीची आवक झाली होती.गत तीन ते चार वर्षापासून पर्जन्यमान कमी असले तरीही शेतकऱ्यांनी पाण्याचे सुक्ष्मा नियोजन करुन पारंपारीक पिकाला बगल देत हळदीवर सर्वाधिक जास्त भर दिला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्ह्यात हळदीचेक्षेत्र वाढले आहे. ज्या ठिकाणी खरीपाचे उत्पन्न किलो मध्ये होत होते त्या ठिकाणी आता हळद क्विंटलाने निघत आहे. काही शेतकरी तर पहिल्या वर्षी कमी बेणे लावगड करतात, त्यावरुन पुढील वर्षी हळदीची लागवड करायची किंवा नाही याचा निर्णय घेतात. मात्र पहिल्यावर्षी हळदीचे पिक घेणारा शेतकरी दुसºयावर्षी पिक घेणार नाही असा शोधूनही शेतकरी सापडणार नाही.आज घडिला जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र वाढल्याने विक्री केंद्रावर हळदीची आवक वाढली आहे. त्यातच हिंगोली येथील कृउबा मध्ये सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस हळद खरेदीसाठी ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बीटच्या दिवशी ७ ते १२ वाजेपर्यंत आलेल्या हळदीचीच खरेदी केली जाणार असल्याने बीटच्या आदल्या दिवशी लांबलचक वाहनांच्या रांगा लागत आहेत. पुर्वी यार्डात कुठेही हळद उतरवुन पुन्हा हळद आण्ण्यासाठी वाहने जात होते. त्यामुळे या ठिकाणी शेतकºयांना हळद टाळण्यासाठी जराही जागा शिल्लक राहत नव्हती.त्यामुळे बाजार समितीने हळदीची आवक घेण्याचे नियोजन केले. त्यामुळे या ठिकाणी हळद विक्रीस आलेल्या शेतकºयांचा दोन ते तिन दिवसांचा मुक्काम टळण्यास तरी मदत झाली आहे. सध्या या ठिकाणी एका दिवशी बीट होऊन दुसºया दिवशी राहिलेल्या हळदीची बीट होऊन शेतकºयांना पैसे दिले जात आहेत.त्यामुळे शेतकºयांची पुर्वीप्रमाणे होणारी गैरसोय थांबण्यास आता पुर्णत: मदत झाली आहे. हळदीला ५ हजार ५०० ते ७ हजार ८३० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याची माहिती सचिव नारायण पाटील यांनी दिली.आता नाफेडने तुरीप्रमाणेच हरभरा खरेदीचे वेळीच आदेश बाजार समितीला दिले आहेत. मात्र या ठिकाणी वाढलेल्या हळदीच्या आवक मुळे नाफेडच्या केंद्रावर हरभरा विक्रीकरण्यासाठी नोंदणी केलेल्या शेतकºयांना हरभरा विक्री करण्यासाठी प्रतिक्षा करण्याची वेळ येत आहे. मात्र या ठिकाणी जागेचीभानगड सांगून हरभरा खरेदीसाठी टाळाटाळ केली जात आहे. इतर ठिकाणच्या नाफेड केंद्रावर हरभरा खरेदीस प्रारंभ होऊन खरेदीही सुरळीत सुरु आहे. मात्र हिंगोली येथील केंद्रावर हरभरा खरेदीसाठी महूर्त मिळालेला नसल्याने तो कधी मिळेल याकडे लक्ष लागले.नाफेड केंद्रावर हरभरा विक्रीसाठी ८०० च्या जवळपास शेतकºयानी नोंदणी केली आहे. मात्र जागाच शिल्लक नसल्याने ती थांबवावी लागत आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर खरेदीस प्रारंभ होईल असे सचिव म्हणाले.
कृउबात साडेचार हजार क्विंटल हळदीची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:45 AM