लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : येथील तहसील कार्यालयाने सर्वांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उद्देशाने स्वस्त धान्य, बोंडअळी अनुदान, निराधारांचे अनुदान वितरीत केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे.दिवाळी हा सण वर्षातील महत्वाचा सण असतो. मात्र, अनेकांना अर्थिक अडचण असल्याने हा सण उत्साहात साजरा करता येत नाही. त्या दृष्टीने तहसील कार्यालयाने दिवाळीपूर्वी विविध यांजनेचे अनुदान व मानधन लाभार्थ्यांना दिले. हे अनुदान मिळाल्यामुळे लाभार्थ्यांना दिवाळी उत्साहात साजरी करता येणार आहे.तालुक्यातील १७२ स्वस्त धान्य दुकानांना नोव्हेंबर महिन्याचे स्वस्त धान्य २० आॅक्टोबरलाच वितरीत केले. स्वस्त धान्य दुकानातील १७२ ई-पॉश यंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहे. अंत्योदय प्रमाणेच इतर लाभार्थ्यांनाही प्रतीकार्ड एक किलो साखर वाटप केली आहे. त्याचबरोबर बोंडअळीचे अनुदान तालुक्यातील ३८ गावांतील शेतकऱ्यांना त्यांच्या आॅनलाईन बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील सुमारे ९ हजार निराधार लाभाथ्यांचे अनुदानही वाटप केले.कार्यालयीन कर्मचाºयांचीही दिवाळी आनंद व उत्साहात साजरी व्हावी यासाठी त्यांनाही दिवाळीपूर्वी वेतन देण्यात येणार असल्याचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी सांगितले.
निराधारांना दिवाळीपूर्वीच मानधन वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 12:18 AM