शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

आश्वासन ठरले फोल; कुणी गावात ढुंकूनही पाहिले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:13 PM

कळमनुरी तालुक्यातील उमरा व शिवणी खु. येथे सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळी दौऱ्यात पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी या गावांना भेटी दिल्या. उमºयात तर रेशन पुरवठा होत नसल्याचे गा-हाणे मांडले. कांबळे यांनी गुरुवारी सकाळी १० वाजता उमºयाला धान्य देण्याचे अधिकाऱ्यांना आदेशित केले. मात्र गावात कुणीच फिरकलेही नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील उमरा व शिवणी खु. येथे सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळी दौऱ्यात पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी या गावांना भेटी दिल्या. उमºयात तर रेशन पुरवठा होत नसल्याचे गा-हाणे मांडले. कांबळे यांनी गुरुवारी सकाळी १० वाजता उमºयाला धान्य देण्याचे अधिकाऱ्यांना आदेशित केले. मात्र गावात कुणीच फिरकलेही नाही.कळमनुरी तालुक्यातील शिवणी खुर्द, रामवाडी, उमरा या दुष्काळी गावांना पालकमंत्र्यांनी बुधवारी भेटी दिल्या. ग्रामस्थांच्या प्रत्येक समस्येवर त्यांनी अश्वासने दिली. मात्र प्रशासनाने त्यावर अंमल केलाच नाही. उमरा येथे तर दुसºया दिवशी सकाळीच धान्य वाटप करण्याची हमी दिली होती. मात्र दुसºया दिवशी दुपारनंतरही या गावाला धान्य मिळाले नसल्याचे दिसून आले. गुरुवारी दुपारी १ वाजता ग्रा.पं.च्या पाणीपुरवठा करणाºया टाकीजवळ भरउन्हात महिलांनी पाण्यासाठी गर्दी केली होती. पाण्यासाठी महिलांमध्ये वादही होत होते. हंडाभर पाण्यासाठी जवळपास २० ते २५ महिला सकाळपासून उन्हात उभ्या असल्याचे सांगत होत्या. तीन महिन्यांपासून एका बोअरवर सर्व गावाला तहान भागवावी लागत आहे. ग्रा.पं. पाणीटंचाईसाठी उपाययोजना राबवित नसल्याचा आरोप प्रयागबाई दिंडे यांनी केला.ग्रा.पं.ने एक बोअर अधिग्रहित केला आहे. त्याला सध्या एक ते दीड तासच पाणी येते. त्यावर ५५० ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे. टँकरसाठी अजून प्रस्ताव पाठविला नसल्याचे सरपंच उषाताई शेकुराव दिंडे यांनी सांगितले.बुधवारी उमरा या गावाला भेट दिली असता ग्रामसेवक केंद्रे हे ग्रा.पं.मध्ये हजर नव्हते. नंतर बीडीओ मनोहर खिल्लारी यांच्या फोनवरून त्यांच्याशी बोलणे झाले. ग्रामस्थही त्यांचा फोन बंद असतो, असेच सांगत होते.उमरा या गावाला तीन महिन्यांपासून रेशन मिळाले नसल्याची तक्रार महिलांनी केली. रेशन वाटप बायोमॅट्रिकवर झाल्यापासून बोटाचे ठसे मशिन स्वीकारत नसल्याने लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. रेशन दुकानदार धान्य दिल्यानंतर बायोमेट्रिक मशिनमधून आलेल्या पावत्या लाभार्थ्यांना न देता फाडून टाकत असल्याचा आरोप वनिता कानबाराव कांबळे यांनी केला.दरम्यान, शिवणी खु. येथे कालच टँकरच्या दोन फेºया सुरू झाल्या. मात्र शुद्ध पाण्याचे स्वतंत्र टँकर आले नाही. यावरून ग्रामस्थांत आज पुन्हा ओरड सुरू असल्याचे दिसले.पालकमंत्री म्हणाले तहसीलदारांना पुन्हा सूचनाउमरा या गावाला धान्य मिळत नसल्याने प्रशासनाला दुसºयाच दिवशी ते देण्यास सांगितले होते. मात्र तांत्रिक अडचण आहे. ती दूर होताच दोन दिवसांत धान्य वाटप करता येईल असे तहसीलदारांनी सांगितल्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत विचारले असता त्याबाबतही प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्याचेही नियोजन तत्काळ होणे शक्य नाही. नगरपालिका किंवा एखाद्या मोठ्या योजनेवरून हे करावे लागेल. त्याची चाचपणी सुरू असल्याचेही ते म्हणाले.शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी पालकमंत्र्यांनी उपविभागीय अधिकाºयांना सूचना केली होती. याबाबत उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांना विचारले असता यासाठी कळमनुरी नगरपालिकेला पत्र दिले. तर पाणी आरक्षण व इतर बाबींसाठी वरिष्ठांकडे हा प्रश्न मांडणार असल्याचे ते म्हणाले.लोकसंख्येच्या तुलनेत अधिग्रहित केलेल्या बोअरचे पाणी लोकसंख्येच्या तुलनेत गावासाठी मुबलक आहे. त्यामुळे टँकरचा प्रस्ताव पाठविला नाही. आता टँकरचा प्रस्ताव पाठविणार आहे.- डी,.एन. केंद्रे,ग्रामसेवक, उमरा

टॅग्स :Revenue Departmentमहसूल विभागwater shortageपाणीटंचाई