आखाडा बाळापूर : तुझ्या मुलाने वाद का घातला? या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत काठ्या,कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी फुटाणा गावातील सतरा जणांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला .
कळमनुरी तालुक्यातील फुटाणा येथील शिवाजी रामराव नरवाडे यांच्या मुलास, सूनेस व फिर्यादीसोबत २८ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता त्यांच्या शेतात जाऊन वाद घातला. जातीवाचक शिवीगाळ केली. गैर कायद्याची मंडळी जमून काठ्या कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी शिवाजी नरवाडे यांच्या तक्रारीवरून माधव दत्तराव कदम, गंगाधर धोंडबा पवार, गजानन धोंडबा पवार, अनिल धोंडबा पवार, रामदास दादाराव कणके, नंदू हरिभाऊ कदम, कपिल हरिभाऊ कदम, सुनील हरिभाऊ कदम, दीपक हरिभाऊ कदम, बालाजी बळीराम कदम, कैलास बळीराम कदम, प्रवीण दत्तराव कदम, अरविंद दत्तराव कदम, गणेश गंगाधर कदम, संगीता गंगाधर कदम, सुनीता गजानन पवार, सविता अनिल पवार सर्व रा. फुटाणा ता. कळमनुरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.