लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कायापालट अभियानात आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य शासनाने जारी केला असून यात शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या जाणार आहेत.स्वच्छ भारत, स्वच्छ शाळा हा कार्यक्रम सुरु केला असून यात आदिवासी विकास विभागांतर्गतशासकीय आश्रमशाळेतील पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्थेमधील दुुरुस्ती व आवश्यकतनुसार बांधकामकरणे, स्वांयपाकगृह , भोजनकक्ष व कोठीगृहे, विद्युतपुरवठा, शालेय इमारत दुरुस्ती, फर्निचर दुरुस्ती,बिल्डिंग स्वच्छता, परिसर स्वच्छता, वसतिगृह दुरुस्ती इत्यादी सुविधांमध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतले आहे. यासाठी विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून संबंधित विभागाच्या अधिकाºयांच्या पथकामार्फत याबाबत नियमित तपासणी करण्यास सांगितले आहे. अशी तपासणी करून अशा सुविधा निर्माण होतील, याची काळजी घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळांचे रुपडे पालटणार असल्याचे दिसते.
आश्रमशाळांत सुधारणांचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 1:06 AM