हिंगोली : भारतीय मानव अधिकार संघटन हिंगोली जिल्हा अध्यक्ष मिलिद प्रधान यांनी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यालयाच्या गेटवर त्यावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखले. कायद्याचा दुरुपयोग करून शासकीय महसूल बुडवून तुकडे बंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी रजिस्टर सेनगाव यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी त्यांनी हिंगोली चे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना पत्र लिहून मागणी केली होती.
काय आहे नेमके प्रकरण
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव खरेदी ऑफिस मध्ये तुकडे बंदी कायद्याचे उल्लंघन केले जात असून, पैशा पोटी सबरजिस्टर मौजे तळणी येथील दस्त क्रमांक २४/२२व २५/२२ व २३/३२ दी.०३/०१/२०२२ तुकडे बंदी कायद्याचे भंग होणारे तीन दस्त हे मोठ्या प्रमाणावर पैशाची देवाण-घेवाण करून कोणतीही चौकशी न करता त्वरित दस्त केलेले आहेत. असे विविध मागण्या त्यांनी अर्जामध्ये नमूद करून अधिकारी साहेब यांनी या प्रकरणाची चौकशी करावी मागणी या पत्रामध्ये केली आहे. सोबतच चौकशी न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी ह्या पत्रामधून दिला होता. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आज मिलिंद परदान यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळ एकच खळबळ उडाली होती.