हिंगोली जिल्ह्यात तालुकानिहाय झालेल्या सरासरी पर्जन्याची आकडेवारी हिंगोली ४९.५०, कळमनुरी ५९. वसमत ५२.५०, औंढा ५६.२०, तर सेनगाव ३५.९० मिमी अशी आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ८१.५८ टक्के पर्जन्यमान झाले आहे. औंढा तालुक्याने तर वार्षिक सरासरीच्या १०० टक्के पर्जन्यमान पार केले आहे. हिंगोलीत ७४.२४ टक्के, कळमनुरी ८३.४८ टक्के, वसमत ७८.४८ टक्के, सेनगाव ७९.५५ टक्के पाऊस झाला आहे.
मंडळनिहाय पर्जन्य
बुधवारी सकाळी ८ वाजेपूर्वीच्या चोवीस तासांत मंडळनिहाय झालेल्या सरासरी पावसाची नोंद हिंगोली ५६.५ मिमी, नर्सी ४६.५, सिरसम ८४.५, बासंबा ३५.५, डिग्रस ४५.५, माळहिवरा ३९.५, खांबाळा ३८.८, कळमनुरी ३६.५, वाकोडी ६३, नांदापूर ४०.५, आखाडा बाळापूर ६२.३, डोंगरकडा ५९.५, वारंगा फाटा ९२.३, वसमत ५१.८, आंबा ५०.५, हयातनगर २७.३, गिरगाव ८०.८, हट्टा ३३.८, टेंभुर्णी ५९, कुरुंदा ६४.३, औंढा २९.५, येहळेगाव ४२.८, साळणा ५४, जवळा बाजार ९८.५, सेनगाव ३६, गोरेगाव २६.५, आजेगाव ३५, साखरा ४१.८, पानकनेरगाव ३६.३, हत्ता ४० मिमी अशी नोंद झाली आहे. जिल्ह्यात चार मंडळात अतिवृष्टी झाली असून, तीन मंडळात ६५ मिमीच्या अगदी जवळ पर्जन्यमान गेले आहे. मात्र ज्या मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यात काही ठिकाणी दाणादाण उडाल्याचे दिसत आहे.