लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मंगळवारी ५ जून, २०१८ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासात एकुण ३८.३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी ७.७७ मिलीमीटर पाऊस झाला. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १३३.९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर एकूण ०३.०० टक्के पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात मंगळवारी ५ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मागील २४ तासांत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे हिंगोली ०४.१४ (२७.४२), वसमत - ५.४३ (२१.४३), कळमनुरी - ६.५० (१७.१७), औंढा नागनाथ - १५.२५ (२८.२५) , सेनगांव - ०७.०० (३९.६७) मंगळवारअखेर पावसाची सरासरी २६.७९ नोंद झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. जिल्हाभरात वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. मंगळवारीही शहरासह ग्रामीण भागात पावसाच्या सरी बरसल्या. तर काही ठिकाणी वादळी वाºयासह ढगाळ वातावरण होते.
२४ तासांत सरासरी ७.६६ मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 12:03 AM