लोकमत न्यूज नेटवर्ककौठा : यावर्षीच्या मोसमात परिसरासह तालुक्यातील बहुतांश भागात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. परिणामी, डिसेंबर महिन्याच्या शेवटपासूनच येथील पाणीपातळीत कमालीची घट झाली असून येणाºया काळात वसमत तालुक्यातील बहुतांश भागांत पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.कौठासह येथील परिसराची यापूर्वी ‘सिंचनाचा पट्टा’ म्हणून ओळख होती. या भागात कालव्यांद्वारे ‘सिद्धेश्वर’ व ‘येलदरी’ धरणाचेपाणी मुबलक प्रमाणात मिळत होते. परंतु, मागील तीन वर्षांपासून या भागातील पर्जन्यवृष्टीचे प्रमाण कमी होत गेले. परिणामी, येथील भागात कोरडवाहू सदृशस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, बागायती असलेला पट्टा एकदम कोरडा झाला. त्याचा विपरीत परिणाम परिसरातील शेती उत्पादनावर झाल्यामुळे उत्पादन घटण्यास सुरूवात झाली आहे.त्याचप्रमाणे दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत चालली असल्यामुळे परिसरातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईसदृश्य स्थिती जाणवत आहे. यावर उपाययोजना म्हणून अनेकजण ‘बोअर’ घेत आहेत. परंतु, ४०० ते ५०० फुटापर्यंत बोअर घेऊनही मुबलक प्रमाणात पाणी लागत नसल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. अजून तर उन्हाळा लागणेही बाकी आहे.कळमनुरी तालुक्यात पाणीटंचाई निवारणार्थ साडेचार कोटींचा पाणीटंचाईचा आराखडा४कळमनुरी - तालुक्यात यंदाच्या मोसमात केवळ ५२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे अत्यल्प पावसाचे साईड इफेक्ट आता कळमनुरीत तालुक्यातील बहुतांश गावांत बघावयास मिळत आहेत. त्या अनुषंगाने यावर्षी पाणीटंचाईच्या निवारणार्थ पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने ४ कोटी ३३ लाख ४४ हजार रूपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.४यावर्षीच्या मोसमात तालुक्यातील काही गावांत आतापासूनच पाणीटंचाईसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक गावांतील पाणीटंचाईची सद्यस्थिती काय आहे ? हे जाणून घेवून प्रशासनाच्या वतीने त्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत. दरम्यान, बहुतेक गावांत आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरूवात झाली आहे.
परत अवर्षणाच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:28 PM
यावर्षीच्या मोसमात परिसरासह तालुक्यातील बहुतांश भागात अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. परिणामी, डिसेंबर महिन्याच्या शेवटपासूनच येथील पाणीपातळीत कमालीची घट झाली असून येणाºया काळात वसमत तालुक्यातील बहुतांश भागांत पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.
ठळक मुद्देकौठा : अत्यल्प पावसाचा परिणाम ; ग्रामस्थांमध्ये चिंता