लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वीज बिलावरील चूकीचा किंवा अर्धवट पत्यामुळे ग्राहकांना विद्युतबिल वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. ग्राहकांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आता महावितरणने चक्क ग्राहकांच्या सुविधेसाठी वीज बिलावरील ‘पत्ता’ दुरूस्तीसाठी मोहिम हाती घेतली आहे.ग्राहकांना वेळेत वीजबिल मिळावे तसेच इतर प्रशासकीय कारणांसाठी महावितरणने हा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील अशा वीज ग्राहकांनी वीजबिलावरील पत्ता दुरूस्तीसाठी उपविभागीय कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन केले. महावितरण नांदेड परिमंडळाने वीज बिलावरील पत्त्यांबाबत आढावा घेतला असता असे आढळुन आले की, अनेक विद्युत ग्राहकांचे वीजबिलांवरील पत्ते हे अर्धवट आहेत. शिवाय बºयाच ग्राहकांच्या बिलांवर चूकीचे पत्ते टाकले आहेत. विशेष म्हणजे काही बिलांवर तर फक्त गावाचेच नाव लिहले असल्याचे निदर्शनास आले. तसेच काही बिलावर पत्ता आहे पण गावाचे नावच नाही. त्यामुळे महावितरणकडून वेळेत वीजबिल वितरीत करूनही ग्राहकांपर्यंत ती पोहचती होत नाहीत. किंवा उशिराने बिल ग्राहकांच्या हाती पडते. त्यामुळे वेळेत बिलभरणा करणाºया ग्राहकांना आर्थीक भुर्दंड सहन करावा लागत आहे. महावितरण सध्या पेपरलेस आॅफिसकडे वाटचाल करीत असल्याने ग्राहकांना अचूक आणि वेळेत सेवा मिळावी यासाठी वीज बिलांवरील पत्ता दुरूस्ती मोहिम राबवित आहे. त्यामुळे ज्या विद्युत ग्राहकांच्या याबाबत समस्यां असल्यास तत्काळ महावितरणच्या संबधित कार्यालयाशी संपर्क करावा लागणार आहे.मोबाईल अॅप : संबंधिक कार्यालयांना सूचनाज्या ग्राहकांनी महावितरणचे मोबाईल अॅप डाऊनलोड केले, त्यांना अॅपद्वारे वीजबिलावरील पत्ता दुरूस्त करून घेणे सहज शक्य आहे. तसेच ‘तक्रार’ पयार्याची निवड केल्यानंतर ग्राहकांना जुना पत्ता दिसेल. त्यात ग्राहकांना बदल करण्याची सुविधा आहे. पत्ता दुरूस्त करून घेण्याबाबतच्या सुचना संबंधीतकार्यालयांना दिल्या आहेत. ज्या ग्राहकांनी मोबाईल नंबर महावितरण कार्यालयात जाऊन नोंदणी करून घेतल्यास त्यांना वीजबिल, वीजपुरवठयाशी संबधीत माहिती घरबसल्या एसएमएसद्वारे मिळण्यास मदत होईल.ज्या ग्राहकांनी मोबाईल अॅप डाऊनलोड केले नाही, अशा ग्राहकांनी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच संबधित अधिकाºयास भेटून पत्ता दुरूस्ती करून घ्यावी.
चुकीच्या पत्त्यामुळे ग्राहकांना भूर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:58 PM