लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथे न.प. सभागृहात रोजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा १७२ कोटी ८३ लक्ष च्या अंदाजपत्रकावर चर्चा करून ४.६२ लाखांच्या शिलकीच्या अंदाजपत्रकास मान्यता प्रदान केली.सभेमध्ये नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी रामदास पाटील, सभापती श्रीराम बांगर, सय्यद अमेर अली, स्वच्छता, शे. आरेफ उस्मान, बागवान अ. माबूद मो. शिकूर, ज्योती कुटे, उपसभापती अर्चना भिसे यांची उपस्थिती होती.यावेळी पहिल्यांदाच अर्थसंकल्पावर लांबलचक चर्चा झाल्याचे चित्र पहायला मिळाले. यामध्ये न.प.ची महसुली जमा २३.७७ कोटी रुपये एवढी अपेक्षित आहे. यात कर ६.0८ कोटी, अभिहस्तांकित महसूल व भरपाई ८.१६ कोटी, भाडे उत्पन्न १.९0 कोटी, शुल्क भाडेआकार आदी २.७७ कोटी, व्याज-३ कोटी तर इतर उत्पन्न १.५९ कोटी अपेक्षित आहे. तर खर्चात अस्थापना-८.८८ कोटी, प्रशासकीय-३.१३, संकीर्ण १0.९१ कोटी असा महसुली खर्च आहे. यात २.३१ लाख शिल्लक अपेक्षित आहे. तर भांडवली जमा अनुदाने, अंशदान १४७.७३ कोटी, कर्जे १.३0 कोटी अशी जमा अपेक्षित आहे. तर भांडवली खर्च १४९ कोटी अपेक्षित आहे. यातही २.३१ लाख शिल्लक अपेक्षित आहे.यावेळी नगरसेवक आनंदा खंदारे, उषाताई धबाले, छाया यादव, अनिता गुठ्ठे, नाना नायक, वैशाली गोटे, जितसिंह साहू, अनिता सूर्यतळ, कय्यूम पठाण, वसंताबाई लुंगे, प्रीती अग्रवाल, दिनेश चौधरी, विशाल गोटरे, गणेश बांगर, निता बांगर, लताताई नाईक, शेख यास्मीन बेगम, शेख निहाल, शेख तैबुन्निसाबी शे. खलील, पंचफुलाबाई लांडगे, आरेफ शे. हैदर, संदीप मुदीराज, सुषमा कदम, सुनील भुक्तार, जावेद राज, जगजितराज खुराणा, सुभाष बांगर, अनिल नैनवाणी व कर्मचारीवृंद उपस्थित होते.
४.६ लाखांचा शिल्लकी अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:03 AM