राहुल टकले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दुष्काळ, कर्जाचा डोंगर आणि पावसाचा लहरीपणा अशा अनेक संकटांना सामोरे जाणाºया शेतकऱ्यांचा जीव शेतातील पिके वाचविण्याच्या प्रयत्नात धोक्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना २०१८-१९ या वर्षात तब्बल ७१८ शेतकºयांना विषबाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.ही आकडेवारी सरकारी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही अनेकांनी उपचार घेतल्याची शक्यता आहे. पावसाअभावी आणि अन्य कारणांमुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकºयांकडून कीटकनाशके फवारली जातात. पिकांवरील अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी नवनवीन कीटकनाशके वापरतात. ही फवारणी शेतकºयांसाठी जीवघेणी ठरत आहे. फवारणी करताना जहाल कीटकनाशकांची बळीराजालाच बाधा होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. पिकांवरील फवारणीनंतर अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात धाव घेण्याची वेळ शेतकºयांवर येत आहे. फवारणी करताना श्वासाद्वारे कीटकनाशक शरिरात जाते; परंतु ते वेळीच लक्षात येत नाही. कीटकनाशकाची बाधा झाल्यानंतर उलटी, मळमळ, चक्कर येणे, डोळ्यांना जळजळ हा त्रास सुरू होतो. त्यानंतर कीटकनाशकाची बाधा झाल्याचे निदर्शनास येते.फवारणी करताना तोंडाला कापड बांधले तर श्वास घेता येत नाही. बूट घातले तर वजन घेऊन चालता येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकºयांचे म्हणने आहे. शेती पिकांवर कीटकनाशक फवारणी करणाºया शेतकºयांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकºयांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून शेतकºयांच्या आरोग्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. २०१८-१९ या वर्षात जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात ७१८ शेतकरी व शेतमजूर दाखल झाले होते. त्यातील ३२१ रुग्णांची स्थीती गंभीर होती. यातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.फवारणी करताना अशी घ्यावी खबरदारीपिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना वाºयाच्या दिशेने फवारणी करावी, कीटकनाशकाचा त्वचेशी संपर्क येवू देवू नये, जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावेत. हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी चश्मा, तोंडाला मास्क अथवा रुमाल या साहित्यांचा वापर करावा. फवारणी करताना कीटकनाशकाची मात्रा नेमून दिलेल्या मापानुसारच घ्यावी. कीटकनाशकाचे डबे सुरक्षितरीत्या नष्ट केले पाहिजेत. कीटकनाशकाची बाधा झाल्यास तात्काळ ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावेत.रुग्णालयनिहाय संख्याफवारणीदरम्यान कीटकनाशकाची बाधा झाल्यानंतर उपचार घेतलेल्या शेतकºयांची संख्या हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय ३२८, कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय ८३, सेनगाव ग्रामीण रुग्णालय ३२, औंढा ग्रामीण रुग्णालय ३९, वसमत उपजिल्हा रुग्णालय २१५, आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालय २१ अशा एकूण ७१८ शेतकरी व शेतमजुरांना कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाली.कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झाल्यास त्या कीटकनाशकासोबतची चिठ्ठी सांभाळून ठेवावी, चिठ्ठीनुसार प्रथमोपचार करुन रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करावे. कीटकनाशक फवारणी करताना अंगभर कपडे घालावे, डोळ्याला चश्मा लावावा, त्वचेद्वारे कीटकनाशकाचा अंश शरिरात जाणार नाही. याची काळजी घ्यावी, कीटकनाशकाचे प्रमाण शिफारशीनुसार घ्यावे.- किशोर श्रीवास,जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली
शेतात फवारणी करताना ७१८ शेतक-यांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:42 AM