लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सुरु असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची धग कायम असून शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर ठिय्या, रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तर गटविकास अधिकाऱ्यांची खुर्ची जाळली.सकल मराठा समाजाचा वतीने आरक्षण जाहीर करावे, मराठा समाजातील आंदोलनकर्त्यावर दाखल गुन्हे मागे घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी शुक्रवारी शहरात सकळ मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन केले. शेकडो समाज बांधवांनी एकत्र येवून येथील नागनाथ मंदिरापासून घोषणा देत मोर्चा काढत तहसीलसमोर सेनगाव- रिसोड रस्त्यावर दुपारी एकरा ते दोन वाजेदरम्यान तीन तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयात घुसून तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडला. तहसीलदार वैशाली पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना आपल्या भावना शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले. नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. जोपर्यंत आरक्षण जाहीर होणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार समाजाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता.गटविकास अधिकाºयांचा दालनाला आगसकल मराठा समाजाचे आंदोलन झाल्यानंतर येथील पंचायत समिती कार्यालयातील गटविकास अधिकाºयांच्या दालनाला आंदोलनादरम्यान दोन ते तीन अज्ञात तरुणांनी घोषणा देत पेट्रोल टाकून आग लावून दिली. या आगीत कक्षातील गटविकास अधिकाºयांची खुर्ची जळून खाक झाली. अन्य साहित्यही जळाले. आग लागल्यानंतर कार्यालयातील कर्मचाºयांनी पाणी टाकून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सिध्देश्वर भोरे, पोलीस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर यांनी भेट देवून पाहणी केली. यासंबंधी सेनगाव पं.स. कर्मचारी संतोष सराफ यांच्या फिर्यादीवरून सेनेच्या संदेश देशमुख व चार जणांवर अनधिकृत प्रवेश करुन शासकीय कार्यालयातील खुर्ची जाळून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येळी फाटा येथे शिवसेनेचा रास्ता रोकोऔंढा नागनाथ : तालुक्यातील औंढा-जिंतूर राज्य रस्त्यावर येळी फाटा येथे मराठा आरक्षणास पाठिंबा देत शिवसेनेतर्फे रस्तारोको केला. यावेळी उखळी व माथा सर्कलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा समाजास आरक्षण द्यावे, आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत सरकारने जाहीर केलेली ७२ हजार जागांची नोकरभरती स्थगित करावी आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलनात जि.प. सदस्य माऊली झटे, माजी सभापती राजाभाऊ मुसळे, उपसभापती रामप्रसाद कदम, बबन ईघारे, संतोष गारकर, शिवाजी कदम, बाळासाहेब देवकर, सुदाम वैद्य, पांडुरंग नागरे, तानाजी मोरे आदीहजर होते. ठाणेदार कुंदनकुमार वाघमारे व मंडळ अधिकारी घुगे यांना निवेदन दिले.
सेनगावात पेटविली बीडीओची खुर्ची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:38 AM