लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : काही राज्यात मतदार वगळणीत मोठ्या प्रमाणात ठरावीक विचारसरणीचे मतदार यादीतून गायब झाल्याचे समोर आले आहे. आपल्याकडे याबाबत दक्ष राहून वगळणी व नाव नोंदणीची प्रक्रियेवर लक्ष ठेवा, असे आवाहन खा.राजीव सातव यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.यावेळी सातव म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे बुथनिहाय नियोजन अगदी सज्ज असले पाहिजे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी सध्याच्या सरकारने जी आश्वासने दिली ती पूर्ण न झाली नाहीत. यावरून जनतेत आधीच रोष आहे. इंधन दरवाढीवरून दररोज सरकारवर टीका होत आहे. भाजपने इंधन दरवाढीवरूनच काँग्रेसला लक्ष्य केले होते. आज सरकार शेजारच्या नेपाळ, भूतानला ३८ रुपयांनी पेट्रोल विकते. देशातच ते ८८ रुपयांवर का गेले? असा सवाल त्यांनी केला. मोदी सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ते शतक गाठेल की काय, असेही ते म्हणाले. तर राफेल लढाऊ विमाने खरेदीत भाजपने पूर्वीचे कंत्राट रद्द करून नवीन कंत्राट दिले. त्यात प्रथमदर्शनीच हजारो कोटींचा घोटाळा दिसतो. एका उद्योगपती मित्रासाठी भाजपने हे केल्याचा मुद्दाही जनतेसमोर पटवून द्यावा, असेही सातव म्हणाले. शेतकऱ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. भाजप सरकार शेतकºयांवर अन्याय करीत असून त्याविरुद्ध लढा देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संजय बोंढारे, जकी कुरेशी, विनायक देशमुख, श्यामराव जगताप, अॅड. गयबाराव नाईक, अब्दुल हाफीज, ज्ञानेश्वर जाधव, केशव नाईक आदी उपस्थित होते.
मतदार वगळणीबाबत सावध राहा-सातव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 12:17 AM