शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी
हिंगोली : पैशांच्या कारणावरून एका शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २३ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बळसोंड भागातील आनंद नगरात घडली.
आनंद नगरातील उत्तम साहेबराव सोळंके हे घरासमोर बसले असता अनिकेत लामतुरे (रा. आनंद नगर) व त्याची आई (पूर्ण नाव माहीत नाही) हे दोघे आले. तुमचा मुलगा प्रदीप याने १० लाख रूपये घेतले होते. ते पैसे परत करा, असे ते म्हणाले. त्यावर प्रदीप व तुमच्यात झालेला पैशांचा व्यवहार आम्हाला माहीत नाही, प्रदीप जिवंत असताना पैसे का मागितले नाही असे त्यांना सांगितले. परंतु, पैसे दिले नाही तर कुटुंबासह खतम करून टाकतो असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत उत्तम सोळंके यांनी म्हटले आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.