शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

हिंगोली जिल्ह्यात दुर्र्गाेत्सव आगमनाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 12:14 AM

जिल्ह्यात दुर्गाेत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. १० आॅक्टोबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे. पूर्वतयारी म्हणून विविध दुर्गादेवी मंडळाची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात दुर्गाेत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. १० आॅक्टोबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे. पूर्वतयारी म्हणून विविध दुर्गादेवी मंडळाची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. दुर्गाेत्सवानिमित्त हिंगोली येथील बाजारात देवीसाठी लागणारे साज श्रृंगार खरेदीसाठी शहरासह ग्रामीण भागातून सोमवारी मोठी गर्दी दिसून आली.गणेशोत्सवानंतर दुर्गोत्सवाची जिल्ह्यात लगबग सुरू आहे. अवघ्या एका दिवसावर घटस्थापना येऊन ठेपली आहे. दुर्गा मातेच्या आगमनाच्या तयारीसाठी नवरात्रोत्सव मंडळांचीही लगबग सुरू असल्याचे दिसून येते. भक्तीमय वातावरणात दुर्गाेत्सवाचा जागर सलग नऊ दिवस चालतो. पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये गरबा, दांडिया उल्हासात खेळला जातो. तयारीसाठी लागणारी खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारात गर्दी दिसून येत आहे. दुर्गाेत्सवासाठी लागणारे साज श्रृंगार हिंगोली शहरातील बाजारात दाखल झाले आहेत. विविध प्रकारच्या साड्या, घागरा-चोली, मुकुट, गंगावन, शस्त्र, नेकलेस, झुमके, पायल, ओढणी तसेच पूजेसाठी लागणारे फळे, अगरबत्ती, धूप, फुलांचे हार रंगबेरंगी मडकी, देवीचे मुखवटे बाजारात उपलब्ध झाले असून खरेदीसाठीसाठी गर्दी होत आहे. हिंगोली शहरातील जिनकर गल्लीत मागील २५ वर्षांपासून देवीच्या साज-श्रृंगार विक्रेते रविशंकर साहू म्हणाले की, मागील दोन दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातून खरेदीसाठी गर्दी होत आहे. परंतु जीएसटीमुळे साहित्यात दरवाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना दरवाढीबाबत समजून सांगावे लागत आहे. असे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. दांडिया खेळण्यासाठी लागणारा पेहराव खरेदीसाठी महिलांची गर्दी होत आहे. नवरात्रोत्सव जिल्ह्यामध्ये शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास ६०० च्यावर घट स्थापन केले जाणार आहेत. गतवर्षी जिल्ह्यात ६४१ घटस्थापना करण्यात आली होती.आकाशवाणी कार्यक्रमाने दसरा महोत्सवाची सुरूवातहिंगोली येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ९ आॅक्टोबर रोजी आकशवाणीच्या कार्यक्रमाने दसरा महोत्सवास प्रारंभ करण्यात येणार आहे. १० आॅक्टोबर रोजी हनुमान यांच्या मूर्तीचे भजनाच्या गजरात मिरवणुक काढण्यात येणार आहे. तसेच प्रदर्शनीचे उदघाटन होणार आहे. दसरा महोत्सवा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. प्रदर्शनीत रोज रात्री ७ ते ११.३० पर्यंत रामलीला आणि नवान्ह पारायणाचा कार्यक्रम होईल. तसेच विविध क्रिडास्पर्धेचे आयोजन दसरा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये कुस्त्यांची भव्य दंगल होणार असून व्हॉलीबॉल, कबड्डी, मॅरॉथॉन, फुटबॉल, लॉन टेनिस, कराटे व बॅडमिंटन आदी क्रिडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात आवश्यकवेळी फेरबदल करण्याचा अधिकार समितीने राखून ठेवला आहे. शिवाय स्पर्धा रद्द करण्याचा अधिकार समितीला असणार आहे.४हिंगोली येथील सार्वजनिक दसरा महोत्सवात विविध प्रकारची आकर्षक आकश पाळणे, तसेच विविध दुकाने थाटली आहेत. हिंगोली येथील ऐतिहासिक दसरा पाहण्यासाठी राज्य-परराज्यातून नागरिक येतात.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक