लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून दुचाकीवरून चोरटे पैशाची बॅग, महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवित असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात एखादी चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच महिलांनी खबदारी घेण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात येत आहेत.हिंगोली शहरात काही दिवसांपूर्वीच अंगावर खाजेची पूड टाकून एका व्यापाऱ्याची पैशांची बॅग हिसकावल्याची घटना घडली होती. यापुर्वीही अशा हिंगोली शहरात घटना घडल्या आहेत. तसेच वसमत येथे गुरूवारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथेही अंगावर खाजेची पूड टाकून पैसे पळविल्याची घटना घडली होती. त्यामुळे जिल्ह्यात एखादी दुचाकीवरून चोरी करून पळ काढणाºयांची टोळी सक्रिय झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जनतेनी खबरदारी घ्यावी, तसेच एखाद्या ठिकाणी असा कोणी संशयित इसम आढळल्यास तत्काळ जवळच्या ठाण्यात माहिती देण्याचे आवाहनही केले जात आहे.हिंगोलीत लाऊडस्पीकर लावून माहितीगुरूवारी वसमत येथील घटनेनंतर खबरदारी म्हणून हिंगोलीत पोलीस प्रशासनाकडून लाऊडस्पीकर लाऊन शहरात महिलांनी दागिन्यांबाबत सावधगिरी बाळगावी, पैसे नेताना बॅगही व्यवस्थित ठेवा. तर संशयित आढळल्यास संपर्क साधा, असे आवाहन केले. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे हिंगोली शहरात जागो-जागी पोलीस तैनात केले आहेत. पेट्रोलिंगही वाढविली, अशी माहिती पोनि उदयसिंग चंदेल यांनी दिली.
दुचाकीवरील चोरट्यांपासून सावधगिरी बाळगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:35 AM