भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल; कॉंग्रेस-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

By विजय पाटील | Published: November 11, 2022 06:07 PM2022-11-11T18:07:48+5:302022-11-11T18:08:03+5:30

खा. राहुल गांधी यांच्यासमवेत शिवसेनेचे युवानेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे हेही दिसून आले.

Bharat Jodo Yatra Enters Hingoli District; Loud sloganeering by Congress-Shiv Sena workers | भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल; कॉंग्रेस-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यात दाखल; कॉंग्रेस-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

Next

हिंगोली : नांदेड जिल्ह्यातून चोरांबा फाटा येथून निघाल्यानंतर सायंकाळी चार वाजता कळमनुरी तालुक्यातील हिवरा फाटा येथे खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दाखल झाली. एक तास उशीर झाल्याने येथून ते झपाट्याने पुढे निघून गेले.

यादरम्यान खा. राहुल गांधी यांच्यासमवेत शिवसेनेचे युवानेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे हेही दिसून आले. शिवाय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. प्रज्ञा सातव, शिवसेनेचे आ. राहुल पाटील आदींसह राज्यातून आलेली काँग्रेसची नेतेमंडळी सहभागी झाली होती.

हिवरा फाटा येथून राहुल गांधी यांनी आपल्या पायांचा वेग वाढविला. रस्त्यात ते काही जणांना जवळ बोलावून बोलताना दिसत होते. शालेय मुले, युवक, डॉक्टरांसह विविध क्षेत्रातील मंडळीचा यात समावेश होता. रस्त्याने चालत असतानाच ते या मंडळींशी विविध विषयांवर चर्चा करीत होते. दुहेरी कठडे, सीआरएफ व स्थानिक पोलीस अशा दुहेरी सुरक्षा व्यवस्थेत त्यांचा हा ताफा अवघ्या काही वेळातच डोंगरकडा येथे पोहोचला.

जिल्ह्यातील शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी
हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक नेते माजी खा. सुभाष वानखेडे, संपर्कप्रमुख बबन थोरात, विनायक भिसे, गोपू पाटील, कृष्णराव पाटील, नांदेडचे दत्ता कोकाटे, बालासाहेब देशमुख आदींसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. संतोष बांगर यांचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, ५० खोके एकदम ओके अशा घोषणाही दिल्या.

Web Title: Bharat Jodo Yatra Enters Hingoli District; Loud sloganeering by Congress-Shiv Sena workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.