राहुल गांधींच्या स्वागतासाठी कळमनुरीकर सज्ज; महिला, तरुणांत पदयात्रेचे प्रचंड आकर्षण
By विजय पाटील | Published: November 11, 2022 02:52 PM2022-11-11T14:52:25+5:302022-11-11T14:53:32+5:30
खा.राहुल गांधी योच्या भारत जोडो यात्रेचे आज हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात आगमन होणार आहे.
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील हिवरा पाटी येथे खा. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी कळमनुरी तालुक्यातील नेतेमंडळीसह जनताही मोठ्या संख्येने उपस्थित झाली आहे. एवढेच नव्हे, तर राज्यातील विविध भागातून ढोल, ताशे, कवायत पथकेही दाखल झाल्याचे पहायला मिळत आहे.
खा.राहुल गांधी योच्या भारत जोडो यात्रेचे आज हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात आगमन होणार आहे. या तालुक्यातील पहिले गाव हिवरा पाटी असून या ठिकाणी दुपारी १२ वाजेपासूनच मोठी गर्दी पहायला मिळत आहे. एवढेच नव्हे, तर इतर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येत आहेत. जीप, टेम्पो, पीकअपमधून ही मंडळी येत आहे. या मार्गावरील अनेक गावांतून अबालवृद्ध या यात्रेचा ऐतिहासिक क्षण डोळ्याने टिपण्यासाठी, राहुल गांधी यांच्या हाकेला ओ देण्यासाठी रस्ता दुतर्फा जमला आहे.
विशेष म्हणजे महिला व लहान मुलांना या यात्रेचे प्रचंड आकर्षण दिसत आहे. जेवढ्या संख्येत ही मंडळी आहे, ती संख्या फारच मोठी दिसत आहे. स्वागतासाठी या ठिकाणी महाद्वार उभारले आहे. सगळीकडे पंजा चिन्ह असलेले तिरंगी झेडे फडकत आहेत.