औंढा नागनाथ (हिगोली ) : येथील बारा जोतिर्लिंगा पैकी आठवे जोतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिरात पहिल्याच श्रावणी सोमवारी भाविकांनी गर्दि केली. दुपार पर्यन्त सुमारे ५० हजार च्या वर भाविकांनी दर्शन घेतले असल्याची माहिती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली आहे
श्रावण महिन्यात शिव शंकराची पूजा केल्याने पुण्य मिळते तसेच ऐच्छिक मनोकामना पूर्ण होत असल्याने येथे भाविक दर्शनासाठी गर्दी करतात सोमवारी पहाटे १ वाजता खासदार राजीव सातव, संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड, विश्वस्थ गणेश देशमुख यांनी सपत्नीक जोतिर्लिंगाची महापूजा केली. यानंतर मंदिर प्रशासनाने २ वाजता मंदिराचे दरवाजे भाविक भक्तांसाठी खुले केले.
रविवारच्या रात्री १० वाजल्या पासूनच भाविक मंदिर परिसरात दाखल झाले होते. यात गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, मध्यप्रदेश आदी राज्यातील भाविकांचा समावेश आहे. आज दुपारनंतरही भाविकांची गर्दी कायम आहे. भगवंताचे भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून संस्थाननने विविध सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.