हिंगोली : वसमत तालुक्यातील हट्टा येथील दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्यात ग्राम पंचायत अपयशी ठरल्याच्या निषेधार्त भिम टायगर सेनेच्या वतीने आज सकाळी मुंडन, चंदादान आंदोलन करण्यात आले.
हट्टा येथे दलित वस्तीतील विकासात्मक कामे, दूषित पाण्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच गावात एका विहिरीजवळ नाला असून त्या नाल्याची खोली ३० फूट आहे. त्यामुळे त्यातील पाणी दूषित होत आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही ग्राम पंचायतकडे दुर्लक्ष करत आहे. याच्या निषेधार्त भिम टायगर सेनेच्यावतीने आज सकाळी मुंडन व चंदादान आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात रंजीत खाडे, रवि खाडे, अरविंद खाडे, कुंडलीक खाडे, मिलींद खाडे, पिराजी राजभोज, अशोक खाडे, करण खाडे व ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.