लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथील जुगार अड्यावर २५ आॅक्टोबर रोजी स्थागुशाच्या पथकाने धाड मारत २२ जणांना ताब्यात घेतले. रात्री उशिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. यात अनेक राजकीय पदाधिका-यांचाही समावेश आहे.आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत स्थागुशाचे पोनि जगदीश भंडरवार यांच्या मार्गर्शनाखाली वारंगाफाटा येथे ही कारवाई केली. आरोपींकडील मोबाईल, जीप व रोकड असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. अब्दुल सय्यद अब्दुल गुलाम दस्तगीर रा. तोंडापूर, कैलास खंडोजी सुर्यवंशी रा. चिखली नवी, प्रफुल्ल रामकिशन पाईकराव रा. तोंडापूर, महोमंद रौफ महोमंद नूर रा. वारंगा फाटा, दत्ता मारोती कदम, रा. अर्धापूर, नांदेड, रमेश यादव थोरात रा.वारंगा, भगवान नारायण बगळे रा. पिंपरखेड, जि. नांदेड, विजय मारोतराव कदम रा. वारंगा, जगदेवराव बापूराव साळुंके रा. दांडेगाव, दत्ता पिराजी सोनाळे रा. मनाठा, नांदेड, बाजीराव रंगराव साळुंके रा. नांदेड, सय्यद कलीम स. महंमद रा. वारंगा, भीमराव शामराव कांबळे रा. डोंगरकडा, कैलास मदन तोष्णीवाल, रा. तोंडापूर, बसंतसिंग सुरेंद्रसिंग गाडीवाले रा. नांदेड, सचिन रावजी बोंढारे रा.बाळापूर, गजानन माणिकराव मोरे रा. बरड शेवाळा, जि. नांदेड, बाबूराव गणुजी इजळकर रा. बरड शेवाळा, नांदेड, सुभाष सखाराम चव्हाण रा. चिखली, हिंगोली, दिलीप गोपाळराव श्रृंगारे रा. मनाठा, जि. नांदेड, शिवाजी नागोराव जिणेवाड रा. वारंगा, उत्तम वाघोजी नरवाडे रा. गायतोंड जि. नांदेड आदींवर कारवाई केली आहे. सदर कारवाई स्थागुशाचे पोनि जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ बालाजी बोले, शंकर जाधव, विलास सोनवणे, संभाजी लेकुळे, विठ्ठल कोळेकर, आशिष उंबरकर, अमित मोडक, ज्ञानेश्वर सावळे, इनामदार, प्रशांत वाघमारे आदींनी केली.या छाप्यात अनेक राजकीय पुढारीही पकडले असल्याने याबाबत जोरदार चर्चा होत होती. माजी जि.प.सदस्य व काही संस्थांचे पदाधिकारी असल्याने याबाबत उलटसुलट चर्चा रंगली. तर बाहेरून कुलूप लावून आत हा जुगार चालत असल्याने सगळे बिनधास्त असताना कार्यवाही झाली.
वारंग्यात जुगाऱ्यांवर मोठी कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:35 AM