हिंगोली : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत राज्यातील ११,८३६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६ कोटी ७० लाख रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ राज्य शासनाच्या वतीने जमा करण्यात आला आहे. यात हिंगोली जिल्ह्यातील १०५ शेतकऱ्यांच्या खात्यावर २५ लाख रुपये जमा झाले आहेत.
राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली. या योजने अंतर्गत पीक कर्जाची नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ दिला जातो. ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यात आधारित प्रमाणीकरण केले, अशा ११,८३६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४६.७० कोटी रुपये शासनाच्या वतीने जमा करण्यात आले आहेत.
या प्रोत्साहनपर लाभ योजने अंतर्गत ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्याचे ऑगस्ट महिन्यात शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ मिळाला नव्हता. या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी १२ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत संधी दिली होती. या कालावधीमध्ये आधार प्रमाणीकरण केलेल्या ११,८३६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४६ कोटी ७० लाख रुपये प्रोत्साहनपर लाभाची रक्कम १ ऑक्टोबर रोजी वर्ग करण्यात आली आहे.
मयत शेतकऱ्यांच्या वारसांना मिळणार लाभजे शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मयत झाले, अशा शेतकऱ्यांच्या वारसांची नावे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण करून योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे येथील सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
आतापर्यंत साडेचौदा लाख शेतकऱ्यांना लाभराज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या योजनेमध्ये २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या तीन वर्षांमध्ये कोणत्याही दोन वर्षात बँकेकडून पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केली आहे, अशा १४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना आजपर्यंत ५३१० कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
राज्यात किती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला लाभजिल्हा - शेतकरी - लाभाची रक्कम (रु. लाखांत)ठाणे - १४ - ६.५६पालघर - १० - ३.९३रायगड - १०६ - ४२.९५रत्नागिरी - ५०३ - १३३.००सिंधुदुर्ग - १६२ - ५७.८६नाशिक - ७१३ - ३५४.००धुळे - १४० - ६८.००नंदुरबार - १३८ - ६८.००जळगाव - ७२९ - ३०७.००अहमदनगर - ५७३ - २६३.००पुणे - ४५४ - २१३.००सोलापूर - ३०९ - १५१.००कोल्हापूर - ३३८ - १४३.००सांगली - २५६ - ११७.००सातारा - ४२४ - १६२.००छत्रपती संभाजीनगर - ५३५ - १७५.००जालना - ३५१ - ७९.००परभणी - ११८ - ३३.००हिंगोली - १०५ - २५.००लातूर - ५४९ - १५५.००धाराशिव - ५८२ - १०४.००बीड - २५६ -९३.००नांदेड - ४५८ - १४८.००अमरावती - ५५३ - २६२.००अकोला - ३७४ - १७२.००वाशिम - १८४ - ८३.४७बुलढाणा - १८३ - ८६.००नागपूर - ४८२ - २२९.००वर्धा - ३८० - १८६.००चंद्रपूर - ४१५ - १६७.००भंडारा - २४३ - ९४.००गडचिरोली - १२३ - ४८.००गोंदिया - २४७ - ८८.००