लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आॅल इंडिया बंजारा सेवासंघ तर्फे २४ फेबु्रवारी रोजी जगतगुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बंजारा युवा संघटनेच्या वतीने शहरातील मुख्य मार्गावरून दुचाकी रॅली काढण्यात आली. न. प. च्या कल्याणमंडपम् येथे घेण्यात आलेल्या श्री संत सेवालाल महाराज जन्मोत्सव सोहळ्यास राष्टÑसंत प. पु. डॉ. रामराव महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.जगतगुरू श्री संत सेवालाल महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हिंगोली शहरातून काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने बंजारा समाजबांधव सहभागी झाले होते. तर कल्याण मंडपम् येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवर उपस्थित होते. यावेळी खा. राजीव सातव, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. संतोष टारफे, आ. जयप्रकाश मुंदडा, माजी आ. जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. गजानन घुगे, माजी खा. शिवाजी माने, बंजारा संघाचे प्रदेशाध्यक्ष शेषराव चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, डॉ. बी. डी. चव्हाण, शशिकांत वडकुते, संजय बोंढारे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, के. के. शिंदे, विठ्ठल चौतमल, दिलीप घुगे, भागोराव राठोड, संजय राठोड, रमेश जाधव, नारायण राठोड, के. डी. राठोड, शामराव जगताप, राम कदम, सिताबाई राठोड, नहेरू महाराज, डॉ. विशाल राठोड, अशोक जाधव, विजय राठोड, लक्ष्मणराव पवार, बन्सी राठोड आदी उपस्थित होते.जयंतीनमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना खा. राजीव सातव म्हणाले बंजारा समाजबांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असून त्यासाठी पाठपुरावा करत राहिल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी श्री संत सेवालाल महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. विविध सामाजिक प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली. हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा पुतळा उभारणीची समाजबांधवांनी यावेळी मागणी केली. यशस्वीतेसाठी लखूसिंग राठोड, एम. जी. राठोड, मयुर राठोड, विठ्ठल पवार, अशोक चव्हाण, सुधीर राठोड, पवार, रमेश जाधव, विजय राठोड, नामदेव चव्हाण, गोविंद राठोड, सुमित राठोड, अशोक राठोड, विजय जाधव, गोवर्धन राठोड, विक्रम राठोड, कैलास राठोड, अनिल राठोड, अशोक नायक, भगवान राठोड, सचिन राठोड हिंमत राठोड आदींनी परिश्रम घेतले.
संत सेवालाल महाराज यांची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:19 AM