शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

भाजप पदाधिकाऱ्यावर गोळीबार प्रकरण; फरार आरोपींची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: August 04, 2023 5:55 PM

येथील जिल्हा परिषदेच्या आवारात १ ऑगस्ट रोजी पप्पू चव्हाण यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला.

हिंगोली : भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस ठेवले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

येथील जिल्हा परिषदेच्या आवारात १ ऑगस्ट रोजी पप्पू चव्हाण यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात त्यांच्या पाठित गोळी लागल्याने त्यांच्यावर नांदेड येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अक्षय इंदोरिया, सत्यम देशमुख, ओम पवार, अजिंक्य नाईक व एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला.

यातील दोन आरोपींना अटक केली असून अल्पयीन मुलास ताब्यात घेतले. मात्र अक्षय गुरूदत्त इंदोरिया (रा. कापडगल्ली, हिंगोली) , ओम गणेश पवार (रा. कांचन नगर, हिंगोली) हे दोघे घटनेनंतर फरार झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या आरोपींची माहिती देणाऱ्यास  पोलिसांनी  २५ हजारांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. तसेच माहिती देणाराचे नावही गोपनिय ठेवण्यात येणार आहे. त्यांच्याविषयी माहिती असल्यास ९०११३२०१०० व ९९२३१०४५२१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी