वसमत: शेतीच्या जुन्या वादाच्या कारणावरून भाजप महिला पदाधिकाऱ्यास मारहाण करून मुलाच्या डोक्यात पिस्तूलाने मारून डोके फोडले. ही घटना वसमत शहरातील बहिर्जी कॉलेजजवळ २२ मार्च रोजी दुपारी १२:२० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी हैदराबाद येथील एकासह अन्य चार जणांविरूद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
वसमत येथील भाजप महिला पदाधिकारी उज्ज्वला तांभाळे यांचे कुटूंबिय व हैदराबाद येथील मोहम्मद फारूक उल्ला बेग उर्फ माजीदउल्ला बेग सयदउल्ला बेग यांच्यात शेतीचा जुना वाद आहे. येथील बहिर्जी कॉलेज परिसरात मोहम्मद बेग यांच्यासह इतर चार जण आले होते. यावेळी मोहम्मद याने उज्वला तांभाळे यांच्या मुलाच्या डोक्यात पिस्तूल मारून डोके फोडले. तर उज्वला तांभाळे यांच्या हाताच्या पंजास मारहाण करून फॅक्चर केले. तसेच अन्य एका नातेवाईकास रॉड, बेल्टने मारहाण केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी गौरव विजयप्रकाश तांभाळे (रा. वसमत) यांच्या फिर्यादीवरून मोहम्मद फारूकउल्ला बेग उर्फ माजीदउल्ला बेग सय्यदउल्ला बेग याचेसह अन्य चार जणांविरूद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संजय हिबारे, पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक मांजरमकर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
वसमत पोलिसांनी तिघे जण घेतले ताब्यात ... शहरात मारहाण करुन पसार झालेल्या आरोपीच्या शोधासाठी शहर पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर होते सायंकाळी ८ वा दरम्यानात तिन जणास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे,या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. - कुंदनकुमार वाघमारे, पोलिस निरीक्षक
वसमत घनास्थळी आरोपींनी केला गोळीबार? तांभाळे यांच्या सोबत वाद घालत प्रथम आरोपींनी हावेत गोळीबार केला त्या नंतर पिस्तुलने गौरव तांभाळे यांच्या डोक्यात मारुन डोके फोडले इतरांना रॉडने मारहाण करण्यात आली, आरोपींनी घटनास्थळी गोळीबार केला का याची चौकशी पोलीस करत आहेत.