निवेदनात म्हटले की, लवकरात लवकर राज्य मागास वर्ग आयोगाचे गठन करावे, राज्यातील ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डाटा जमा करून तो न्यायालयात सादर करावा. न्यायालयाच्या या आदेशाला जवळपास पंधरा महिने झाले तरीही आयोग गठन झाला नाही. ही बाब गंभीर आहे. सरकारला न्यायालयाने वारंवार तारखा दिल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पाच ते सात वेळा पत्र पाठवून ही बाब लक्षात आणून दिली. मात्र, काहीच कार्यवाही होत नसल्याने आंदोलनाची वेळ आल्याचे म्हटले आहे. निवेदनावर आ. तान्हाजी मुटकुळे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाईक, माजी आ. रामराव वडकुते, बाबाराव बांगर, के.के.शिंदे, बिरजू यादव, प्रवीण पोफाळकर, ज्ञानेश्वर गोटरे, नारायण खेडेकर, पी.आर. देशमुख, लखन गोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ओबीसी आरक्षणासाठी भाजपतर्फे आक्रोश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:22 AM