शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
3
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
4
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
8
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
9
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
10
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
11
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
12
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
13
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
14
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
15
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
16
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
17
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
18
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
19
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
20
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान

हिंगोली जिल्ह्यात ६ शाळांत आढळले बोगस विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 1:13 AM

राज्यात शाळातील विद्यार्थ्यांची विशेष पटपडताळणी मोहीम ३ ते ५ आॅक्टोबर २०११ मध्ये केली. या मोहिमेत बोगस पटसंख्या आढळून आलेल्या शाळांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यादृष्टिने शिक्षण विभाग या शाळांची तपासणी करत आहे. तपासणीत शाळा दोषी आढळल्यावर त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : राज्यात शाळातील विद्यार्थ्यांची विशेष पटपडताळणी मोहीम ३ ते ५ आॅक्टोबर २०११ मध्ये केली. या मोहिमेत बोगस पटसंख्या आढळून आलेल्या शाळांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यादृष्टिने शिक्षण विभाग या शाळांची तपासणी करत आहे. तपासणीत शाळा दोषी आढळल्यावर त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिली.विशेष पटपडताळणी मोहिमेत जिल्ह्यातील सहा शाळेत बोगस विद्यार्थीसंख्या आढळून आली आहे. यात इंदिरा गांधी प्राथमिक शाळा आखाडा बाळापूर, शारदा प्राथमिक शाळा कळमनुरी, जि.प.प्रा. शाळा गणेशवाडी, ता. कळमनुरी, जि.प. प्रा. शाळा साखरा तांडा, ता. सेनगाव, जि.प. प्रा. शाळा पवारवाडी, ता. सेनगाव व जि.प. प्रा. शाळा नवलगव्हाण, ता हिंगोली यांचा समावेश आहे. यात दोन खाजगी संस्थेच्या व ४ जि.प.च्या शाळांचा समावेश आहे. कळमनुरी तालुक्यात तीन, सेनगाव दोन तर हिंगोली तालुक्यातील एक अशा एकूण सहा शाळेत बोगस विद्यार्थी पटसंख्या आढळून आली आहे. ७ आॅगस्टपासून तालुक्यातील इंदिरा गांधी प्राथमिक शाळा आखाडा बाळापूर व शारदा प्राथमिक विद्यालय कळमनुरी या दोन शाळांची तपासणी सुरू आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांची तपासणी सध्या करू नका, असे वरिष्ठांचे आदेश असल्याचे पातळे यांनी सांगितले. ७ आॅगस्ट रोजी इंदिरा गांधी प्राथमिक शाळेची प्राथमिक तपासणी माध्यमिक चे शिक्षणाधिकारी डी.के.इंगोले, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे, विस्तार अधिकारी बालाजी गोरे यांनी केली. यातील अहवाल अजून येणे बाकी आहे.---अनुदान लाटले : बनावट दाखविले विद्यार्थीया शाळांनी शासनाचे अनुदान घेतले का? बनावट विद्यार्थी दाखवून शासनाची फसवणूक, शालेय पोषण आहार अनुदान शाळा अनुदान शासनाचे विविध अनुदान उचलून बोगस पटसंख्या दाखवून शासनाची कशी फसवणूक केली. किती रकमेची शासनाची फसवणूक केली. आदींसह शाळेतील सर्व अभिलेख्यांची तपासणी करण्यात येत आहे. यात शाळा दोषी आढळल्यास संस्थाध्यक्ष, सचिव व मुख्याध्यापकावर पोलिसांत गुन्हे दाखल होणार आहेत. हे गुन्हे १० आॅगस्टच्या आत करण्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत.---१० आॅगस्ट रोजी होणार गुन्हे दाखलतपासणीत दोन संस्थेच्या शाळा दोषी आढळल्यास त्यांची मान्यता रद्द होवून त्यांच्यावर पोलिसांत गुन्हेही दाखल होणार आहेत. जिल्ह्यातील ४ जि.प. शाळांची तपासणी नंतर होणार आहे. राज्यातील सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांची पटपडताळणी महसूल विभागामार्फत करण्यात आली. अधिकची पटसंख्या दाखवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ या शाळांनी घेतला होता. त्यामुळे बोगस पटसंख्या दाखविणाºया शाळांचे धाबे दणाणले आहे. तपासणी या संस्थेच्या दोन्ही शाळा, दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर १० आॅगस्ट रोजी पोलिसांत गुन्हे दाखल होणार आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षण