लोकमत न्यूज नेटवर्ककौठा/वसमत : नांदेड-जिंतूर- औरंगाबाद महामार्गाचे सध्या रूंदीकरणासह मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. संपूर्ण रस्ता उखडला असून आता त्यावर सिमेंट काँक्रीटकरण करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या हा मार्ग अत्यंत वाहने चालविण्यासाठी कठीण बनला आहे. कसरत करत येथून मार्ग काढावा लागत आहे. पोळा सणाच्या दिवशी या मार्गावरील बोराळा पाटीजवळ बिअरची वाहतूक करणारा ट्रक उलटून रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडला.औरंगाबाद येथून एका कंपनीच्या बिअरचे बॉक्स भरून मंचेरियालकडे जाणारा ट्रक क्र.एम.एच.२६ एच.७५२८ बोराळा पाटीजवळ रस्त्याच्या अवस्थेत उलटला. ट्रक उलटल्याचे कळताच परिसरातील व या मार्गावरून ये-जा करणाऱ्यांनी मात्र संधी साधत बॉक्स पळविले. ट्रक चालक हा एकटाच असल्याने व तोही किरकोळ जखमी झाल्याने त्याचे कोणीच ऐकायला तयार नव्हते. उलटलेल्या ट्रकमधील बिअरचे बॉक्स रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पडले होते. महामार्गावरून ये-जा करणाºयांनी घटनास्थळावरील पोलीस येईपर्यंत अनेक बॉक्स पळविल्याचे ट्रकचालक फेरोजखान (रा. औरंगाबाद) यांनी सांगितले.घटनास्थळी वसमत ग्रामीणचे सपोनि बी.आर. बंदखडके, बीट जमादार भूजंग कोकरे, आम्ले यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकाळयांनी भेट दिली. पोळ्याच्या दुसºया दिवशी कर साजरी करणाºयांनी हे बॉक्स पळविले अशी विनोदात्मक चर्चा ऐकवयास मिळत होती.
बोराळा पाटीवर बिअरचा ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 1:16 AM