कयाधू नदी पुलावरुन हिंगोली शहरात येतेवेळेस काही वाहचालक वेगाने चालवित असल्यामुळे या ठिकाणी दोन गतिरोधक उभारण्यात आले आहेत. परंतु, हे दोन्ही गतिरोधक सद्य:स्थितीत निमुळते झाले आहे. बुधवारी पडलेल्या पावसामुळे दोन्ही गतिरोधकांच्या बाजूला पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना शहरात येतेवेळेस चांगलीच कसरत करावी लागत आहे. पाण्याचे डबके साचलेले असतानाही दुचाकीस्वार मात्र अपघाताची भीती न बाळगता गतीरोधकाला सोडून पाण्यातून मार्ग काढताना पहायला मिळत आहेत.
मुरुम टाकण्याची मागणी
कयाधू नदी पुलावरुन शहरात येतेवेळेस टाकलेले गतिरोधक सद्य:स्थितीत निमुळते झाले आहेत. गतिरोधकांच्या दोन्ही बाजूला थोडा जरी पाऊस पडला तरी पाणी साचत आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संंबंधित विभागाने याची दखल घेऊन दोन्ही खड्ड्यात मुरुम टाकावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
फोटो २