शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

दोघांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:53 AM

वसमत तालुक्यातील हट्टा जि.प.प्रशालेचे माध्यमिकचे विज्ञान विषयाचे शिक्षक प्रताप नरसिंगराव देशपांडे यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.

वसमत तालुक्यातील हट्टा जि.प.प्रशालेचे माध्यमिकचे विज्ञान विषयाचे शिक्षक प्रताप नरसिंगराव देशपांडे यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. देशपांडे हे नुसते उपक्रमशिल शिक्षकच नाहीत तर त्यांनी माध्यमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यास सतत तीन वर्षे यशदासाठी काम केले. हट्टा प्रशाला ही बाळापूरनंतर दुसऱ्या क्रमांकाची मोठी शाळा. पाचवी ते दहावीची पटसंख्या ५२५. मराठी व सेमी इंग्रजीचे शिक्षण दिले जाते. मागील ९ वर्षांपासून देशपांडे येथे आहेत. ते मूळचे हट्ट्याचेच. मुलांना शिकविणे एवढेच ध्येय न ठेवता एनटीएस, एमटीएस, एनएनएमएस या शालेय स्पर्धा परीक्षांसाठी तयार केले. आज ३३ विद्यार्थ्यांना हजार रुपये प्रतिमहिना राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळते. वक्तृत्व स्पर्धेतही मुले चमकतात. याच शाळेत विभागीय वक्तृत्व स्पर्धाही होते. अभ्यासपूरक व अभ्यासेतर उपक्रमांची सरळमिसळ करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष दिले जाते. कौटुंबिक समस्या, कुमारवयीन समस्यांमुळे मुले अनेकदा भरकटतात. अशांचे समुपदेशन करण्याचे कामही या शाळेत खुबीने होते. शहरी भागातही होणार नाहीत, अशा विविध उपक्रमांची रेलचेल या शाळेत सुरू असते. या सर्व बाबींमुळे अनेकांनी नातेवाईकांची मुले येथे आणून या शाळेत घातली. त्यामुळे जि.प.ची शाळा असूनही विद्यार्थी शोधण्याची वेळ कधी येत नाही. विशेष म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचा निकाल सातत्याने १00 टक्के लागल्याचेही देशपांडे अभिमानाने सांगतात. ते गणित व विज्ञान विषयाच्या राज्याच्या विषय साधन गटाच्या कोअर ग्रुपचे सदस्यही आहेत. तसेच मागील दहा वर्षांपासून पेपरसेटिंगमध्येही त्यांचा अनुभव आहे.या पुरस्काराबाबत देशपांडे म्हणाले, सहकारी, गावकºयांची साथ लाभल्याने शाळेत अनेक उपक्रम राबविता आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उपक्रमासाठी जे काही मनपूर्वक, हृदयातून प्रयत्न केले, त्याची पोचपावती आज मिळाल्यासारखे वाटत आहे.कळमनुरी तालुक्यातील सांडस येथील सहशिक्षक विनायक भोसले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. भोसले हे ५ ते ६ वर्षांपासून सांडस या शाळेत कार्यरत आहे. त्यांच्या पुढाकाराने तंबाखूमुक्त गाव झाले आहे. त्यांच्याकडे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांचाही पदभार आहे. अध्ययनस्तर निश्चितीत त्यांनी सालेगाव केंद्र गुणवत्तेत दोनवेळा जिल्ह्यातून प्रथम आणले आहे. तंबाखूमुक्तीसाठी त्यांनी गावात बैठका घेतल्या. त्यांचे दुष्परिणाम सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी सार्वजनिक शपथ घेवून गाव तंबाखूमुक्त झाल्याचे घोषित केले. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी ते प्रयत्न करतात. ज्ञानरचनावादानुसार अध्यापन करणे, अध्यापनात शैक्षणिक साहित्याचा पुरेपूर वापर यावर त्यांचा भर असतो. त्यांनी शाळेत ‘एक कागद दाखवा, हजार रुपये बक्षीस मिळवा’ हे अभियान राबविले. त्यामुळे शाळा व शाळेच्या परिसरात एकही कागद दिसत नाही. अनेक कार्यशाळेत त्यांनी गुणवत्ता कशी वाढवावी, याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले. शाळा सिद्धीमध्ये सांडस शाळा ‘अ’ श्रेणीत आणली. आगळा-वेगळा परिपाठ घेवून दररोज १० इंग्रजी शब्द विद्यार्थ्यांकडून पाठ करून घेणे, प्रश्नपेढी तयार केली. सर्व वर्गखोल्या डिजिटल केल्या. त्यामुळे जगातील नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसमोर आणले. गणित विषयाचे ११०० प्रश्न असलेली प्रश्नपेढी तयार केली. दिवसभराच्या अभ्यासक्रमाची दुपारी साडेतीन वाजता पुनरावृती घेतली जाते. त्यामुळे येथील सर्व विद्यार्थी १०० टक्के प्रगत आहेत. लोकसहभागातून शाळेला रंगरंगोटी केली. शाळेत अनेक रोपटी फुलांची झाडे लावून शाळेचा परिसर निसर्गरम्य केला. शिवाय शाळा परिसरात स्माईल झोनची निर्मित्तीही केली. शैक्षणिक योगदानाबद्दल हा सन्मान मिळाल्याचा आनंद भोसले यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा