लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षिकेच्या रजेची संचिका पाठविण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारल्याने शिक्षण विभागातील लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. या लिपिकास निलंबित केल्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आहेत.जि.प.च्या शिक्षण विभागातील लिपिक राजाराम पांडुरंग मुंढे याने एका शिक्षिकेच्या रजा मंजुरीची संचिका संबंधित पंचायत समितीला पाठविण्यासाठी चार हजारांची लाच स्वीकारली होती. १ आॅगस्ट २0१८ रोजी ही घटना घडली होती. यात संबंधिताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यामुळे मुंढे यास १ आॅगस्टपासून निलंबित केल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांनी काढला आहे. तर निलंबन काळात संबंधित लिपिकास औंढा पंचायत समिती हे मुख्यालय दिले असून खाजगी नोकरी पत्करता येणार नाही.
लाच प्रकरणातील ‘तो’ लिपिक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:21 AM