औंढा नागनाथ ( हिंगोली): बस आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जलालदाभा चौफुली येथे आज सायंकाळी ४ वाजेदरम्यान घडली.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औंढा नागनाथ-पिंपळदरीमार्गे कळमनुरी जाणारी बसचा ( क्र. एमएच 20 बीएल 1149) जलालदाभा चौफुलीजवळ दुचाकीसोबत समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार रमेश वाढवे ( रा. मसोड) यांचा जागीच मृत्यू झाला. वाढवे हे गवंडी कामगार होते.