हिंगोली आगारात मानव विकासच्या २१ बसेस सद्य:स्थितीत आहेत. शाळा सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असली, तरी पालकांनी विद्यार्थ्यांचे पास काढले नसल्यामुळे आम्हाला बसेस सुरू करता येत नाहीत. दोनशे मुलींनी पास काढला असल्यामुळे हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील मानव विकासची बस सुरू केली आहे. हिंगोली ते सिरसम ही बस नियमित सुरू आहे.
कोरोनाचे प्रमाण जिल्ह्यात अजूनही कायम आहे. कोरोना आजाराच्या भीतीमुळे पालकवर्ग शाळा सुरू झाल्या असल्या तरी मुलांना पाठवत नाहीत. विद्यार्थ्यांनी पास काढला तर महामंडळाला बस सुरू करता येते. तेव्हा पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना पास काढण्यास सांगावे, असे महामंडळाचे म्हणणे आहे.
कोरोनाआधी सर्वच बसेस धावत होत्या. २३ मार्चपासून कोरोनाचा संसर्ग वाढला होता. विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मानव विकास व इतर बसेस बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनाआधी मात्र जिल्ह्यातील सर्वच बसेस धावत होत्या. आज जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी पालकवर्ग विद्यार्थ्याचे पास काढत नाहीत. सद्य: स्थितीत हिंगोली तालुक्यातील सिरसम या मार्गावर मानव विकासची बस सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर २०० मुलींनी पास काढला आहे. त्यामुळे महामंडळाने मानव विकासची बस सुरू केली आहे.
प्रतिक्रिया
हिंगोली आगारात मानव विकासच्या २१ बसेस आहेत. यापैकी हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील बस सुरू आहे. पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचा पास काढावा. म्हणजे बसेस सुरू करता येतील.
-संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख.
कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने एस. टी. महामंडळाने बसेस सुरू केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद वाटत आहे. दुसरीकडे सावरगावची बस मात्र वेळेवर धावत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.
-कार्तिक दिवटे, विद्यार्थी.
जिल्ह्यात काही ठिकाणीच महामंडळाच्या बसेस सुरू केल्या आहेत. हिंगोली तालुक्यातील राहोली येथील बस सुरू आहे; पण ही बस वेळेवर धावत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेला उशीर होत आहे.
समाधान लोणकर, विद्यार्थी.