हिंगोली : /महसूलच्या /मदतीला धावून येणारे गावपातळीवरील महत्त्वाचे पद असूनही हीन म्हणून एरवी कोतवाल पद दुर्लक्षिले जाते. मात्र याच पदासाठी आता पुढील संधीच्या दृष्टीने अनेकांची गर्दी झाली आहे. ११५ जागांसाठी ४३१३ अर्ज आले आहेत. यातील ३९१८ पात्र ठरले.कोतवाल पदासाठी चौथी उत्तीर्णतेची अट असल्याने अर्ज मोठय़ा संख्येने येतील, अशी अपेक्षा होती. मात्र तेवढय़ा संख्येत ते आले नसले तरी अर्ज करणार्यांत अनेकांनी दूरदृष्टी ठेवल्याचे दिसून येते. या पदावर जाणार्यांना पुढे खातेअंतर्गत परीक्षेद्वारे पुढील पदावर जाण्याची संधी आहे. त्यामुळे अनेकांनी उच्च शिक्षण घेतलेले असतानाही या पदासाठी अर्ज केला आहे. पदवीच नव्हे, तर पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांचा यात समावेश आहे. शिवाय एका सज्जाला अनेक गावे असतात. तरीही २६0 मुलींनी अर्ज दाखल केले आहेत. /(जिल्हा प्रतिनिधी)
■ हिंगोली तालुक्यात १११५ पैकी १0१८, वसमत तालुक्यात ५२८ पैकी ४६0, कळमनुरी तालुक्यात ९७६ पैकी ८८६, सेनगाव तालुक्यात ९८३ पैकी ८९२ तर औंढा नागनाथ तालुक्यात ७११ पैकी ६६0 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात प्रवर्गनिहाय आरक्षण असून मुलींसाठीही जागा राखीव आहेत. त्यामुळे मुलींचे २६0 अर्ज आले आहेत.
■ हिंगोली जिल्ह्यात कोतवाल पदाच्या एकूण ११५ जागांसाठी परीक्षा होत आहे. त्यात वसमत तालुक्यात १७, हिंगोली-२५, औंढा-२१, कळमनुरी-२६, सेनगाव-२६ अशा जागा आहेत.