लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : चारचाकी वाहनाने हिंगोलीकडे येत असताना औंढा-हिंगोली मुख्य रस्त्यावरील संतुकपिंपरी येथे वाहन येताच एका इसमाने कारच्या काचा फोडल्याची घटना १८ एप्रिल रोजी घडली.बालासाहेब बाबुराव पोले हे हिंगोली-औंढा मुख्य रस्त्यावरून वाहनाने येत होते.यावेळी संतुकपिंपरी परिसरात वाहन येताच महेंद्र दत्तराव दिपके याने वाहनावर दगड फेकून काचा फोडल्या. यात कारचे नुकसान झाले. यात चालक पोले व कारमधील संतोष वºहाडे जखमी झाले. याप्रकरणी बालासाहेब पोले यांच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण ठाण्यात महेंद्र दिपके याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना जी. के. पोकळे करीत आहेत.