आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात हिंगणी २, गाडीपुरा १, कंजार १, एनटीसी १, जिजामातानगर १, रिसाला बाजार १, गंगानगर ३, फाळेगाव १, ग्रामीण पोलीस ठाण्याजवळ १, कमलानगर २, लासीना १, जि.प. क्वार्टर्स, ३, पातोंडा १, बासंबा १, अष्टविनायकनगर १, नेहरूनगर १, बाळापूर ३, कडोळी १, रामाकृष्णानगर ४, आडगाव २, लक्ष्मीनगर १, इसापूर रमना १, गाडीपुरा १, तोफखाना १, पलटण १, वाकाळी १, सरस्वतीनगर १, आदर्श कॉलेज १, विद्यानगर १, तिरूपतीनगर १, पेन्शनपुरा १, नारायणनगर १, माळहिवरा १ असे ४९ रुग्ण आढळले.
वसमत परिसरात पिंपळा चौरे येथे २४ रुग्ण आढळले. औंढा परिसरात जवळा बाजार १, बोरजा १, वडद १, जांब १, औंढा ४ असे ८ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात बेलमंडळ १, कळमनुरी ३, जामगव्हाण २, म्हैसगव्हाण २, सांडस २, सालेगाव २, सेलसुरा २, शिवनी ३, जवळा पांचाळ ४, डोंगरकडा २ असे २३ रुग्ण आढळून आले आहेत.
बुधवारी बरे झाल्याने १८५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातून ६२, लिंबाळा ३५, वसमत २०, कळमनुरी ३८, औंढा ३० असे रुग्ण घरी सोडले.
पाचजणांचा मृत्यू
हिंगोली जिल्ह्यात बुधवारी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये लोहरा येथील ५० वर्षीय महिला, गिरगाव येथील ३८ वर्षीय पुरुष, प्रगतिनगर येथील ६२ वर्षीय पुरुष; तर पेडगाव येथील ६७ वर्षीय पुरुष असा चौघांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला; तर कळमनुरीत आखाडा बाळापूर येथील ४६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १६९ जणांचा मृत्यू झाला आहे.
गंभीर रुग्णसंख्या ३६८
बुधवारपर्यंत एकूण १०६७८ रुग्ण आढळले. यांपैकी ९१७० बरे झाले. सध्या १३३९ जणांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील विविध कोरोना रुग्णालयांत दाखल ३४० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने ते ऑक्सिजनवर आहेत; तर २८ कोरोना रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण ३६८ जण गंभीर आहेत.