लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : नांदेड-हिंगोली महामार्गावरील आखाडा बाळापूर येथे पोलीस ठाण्यासमोर ११ डिसेंबर रोजी रात्री दीडच्या सुमारास एका मालवाहू ट्रकने संत्र्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. यात पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले असून यामध्ये कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.अमरावतीवरून संत्रा भरून टेम्पो क्रमांक एम. एच. ४२-बी ९७७४ हा हैदराबाद कडे जात होता. रात्री दीडच्या दरम्यान बाळापूरमधून जात असताना समोरून येणारा मालवाहू ट्रक क्रं. आर. जे. ११ जीबी ०८५५ ची धडक बसली. यामध्ये आयशर गाडीचे मोठे नुकसान झाले. गाडीतील ३५० कॅरेट संत्रे भरलेले होते. ते पूर्ण रस्त्यावर सांडले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी इमरान मैसन चाऊस, रा. नांदेड यांनी दिलेल्या फियार्दीवरून ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच अपघात झाल्यामुळे गाडीतील संत्र्याचे कॅरेट भरून दुसºया वाहनाने रवाना केले. परंतु काही माल भरता आला नाही. तो सकाळी उचलून टाकण्याची तयारी सुरू होते. मजूरही लावले होते. मात्र काहींनी संत्रे मागितले अन् त्यांना ते नेण्यास परवानगीही दिली. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांनी हे संत्रे नेले. मात्र काही वृत्तवाहिन्यांवर माल लुटल्याची बातमी आली त्यावरून अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली. याचीही एकच चर्चा होत होती.आखाडा बाळापूर येथे झालेल्या अपघातात सकाळी सहा वाजल्यापासून गाडी रस्त्याच्या बाजूला काढेपर्यंत पूर्णवेळ मदत करण्यासाठी मी स्वत: व बाळापूरचे ग्रामस्थ झटत होते. परंतु काही वृत्तवाहिन्यांनी मात्र बाळापूरकरांना चोर लुटारू ठरवले. अपघात करणारी गाडी बाळापूरच्या तरुणांनी पकडून दिले. रस्ता सुरळीत केला. याबाबत चांगले लिहिण्याऐवजी आमच्या गावाची बदनामी केली याबाबत खूप वाईट वाटते, असे व्यापारी सोपान बोंढारे यांनी सांगितलेचोरी झाली नाहीरात्री अपघातानंतर ३५० कॅरेटमध्ये भरलेला माल रस्त्यावर पडला. चांगला माल आम्ही दुसºया वाहनाद्वारे रवाना केला. उरलेला पंधरा-वीस कॅरेट माल पडला होता. तो भरून टाकत असताना काहींनी नेण्याची तयारी दाखविली. आम्ही त्यांना नेण्यास सांगितले. चोरी झाली नसल्याचे चालक इमरान चाऊस यांनी सांगितले.