हिंगोली : जिल्ह्यात कापूस पिकाचे क्षेत्र ४६,२८० हेक्टर वर लागवड झाली असून सोयाबीनचे क्षेत्र २,३६८२९ हेक्टर आहे. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पावसातील खंडामुळे आणि जोमदार कायिक वाढीमुळे कापूस पिकावर मावा, तुडतुडे, रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.कृषि विभागामार्फत कापूस पिकांवरील कीडरोग सर्वेक्षणसाठी क्रॉपसॅप योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत कापूस उत्पादन गावामध्ये निवडक प्लॉट निवडून त्याचे दर आठवड्यास सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण अहवालानुसार मावा, तुडतुडे, फुलकिडे ईटीएल च्या पुढे जात असल्याचे निदर्शनास आल्याने प्रादुर्भावाबाबत व ना.म.कृ.वि. परभणी विद्यापीठ तज्ज्ञांशी चर्चेनुसार कापूस पिकावर वाढ संजीवके, हार्मोन्स, टानिक या सारख्या कायिक वाढीस मदत करणाºया औषधाचा वापर कारणीभूत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. ही वाढ संप्रेरके पिकावर फवारल्यामुळे पिकांच्या कायीक वाढीस पोषक ठरून लुसलूसीतपणा वाढतो. पिकातील ही अनावश्यक कायिक वाढ लुसलुसीतपणा मावा, तुडतुडे, फुलकिडे या सारख्या रस शोषक किडींना पोषण ठरतो.परिणामी, या किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीवरील खर्च वाढतो. त्यामुळे शेतकºयांना आवाहन करण्यात येते की, वाढ संप्रेरके संजीवके हार्मोन्सचा वापर टाळावा.गुलाबी बोंडअळीचे नर पतंग मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधीत करून नष्ट करण्यासाठी २० कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावेत. तसेच ट्रायकोग्रामा बॅक्टरी १.५ लाख हेक्टरी सोडावेत. त्या करीता ट्रायकोकार्ड कृषी विद्यापीठ परभणी येथे उपलब्ध आहेत. निंबोळी अर्क ५ टक्के ची फवारणी ह्या उपाययोजना कराव्यात तदनंतर रासायनिक किटकनाशक प्रोफेनोफॉस ५० ईसी २० मि.ली. किंवा क्विनालफॉस २० टक्के, एएफ २० मी.ली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी ग्रॅम पती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी,सोयाबीन:- सोयाबीनवरील पाने खाणाºया अळीसाठी प्रोफेनोफॉस ५० ईसी २५ मी.ली. १० लिटर पाण्यातून फवारणी करावी, चक्री भुंगा नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस ४० ईसी १२ मी.ली. किंवा थायोक्लोप्रीड १५ मी.ली. १० लिटर पाण्यातून फवारणी करावी व सोयाबीन पिकांमध्ये पक्षीथांबे उभारावेत, पक्षीथांब्यावर बसून पक्षी पिकातील अळ्या वेचून खातील. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रिय कर्मचाºयांशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे व उपविभागीय कृषी अधिकारी बी.एस. कच्छवे यांनी केले आहे.