केंद्रीय प्राथमिक शाळा, सवड
सवड : हिंगोली तालुक्यातील सवड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच गजानन थोरात, तसेच केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सी.सी. खिल्लारे यांची उपस्थिती होती. फाेटाे नं.०२
अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय, वसमत
वसमत : येथील अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष प्रा. बी. डी. कदम, मुख्याध्यापिका सरिता पतंगे, पर्यवेक्षिका श्यामल शिंदे, मिटकर, कातोरे, पठाडे, खंदारे, साबणे, सोनटक्के, संगेकर, कहालेकर, डोंगरे व इतर कर्मचारी उपस्थित होते. फाेटाे नं. ०३
डोंगरकडा फाटा येथे शिवजयंती साजरी
डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य डॉ. सुधाकर लोमटे, सामाजिक कार्यकर्ते सखाराम अडकीने, राज अडकीने, संदीप गावंडे, अर्जुन वानखेडे, आनंद अडकीने, केरबा मस्के, दिलीप गावंडे, बाळू अवचार यांच्यासह शिवजयंती मंडळाचे कार्यकर्ते यांची उपस्थिती हाेती. फाेटाे नं. ०४
जयपूर येथे शिवजयंती साजरी
जयपूर : सेनगाव तालुक्यातील जयपूर ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी नूतन सरपंच संदीप पाटील, उपसरपंच द्वारकादास झंवर, पोलीस पाटील अंबादास पारीस्कर, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.
पाेदारमध्ये जयंती साजरी
हिंगोली: येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती ऑनलाइन पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य संजीवजी भारद्वाज, व्यंकट हरिदास रेड्डी, मुख्याध्यापिका संध्या तोमर, सोमाणी, देवेंद्र खरटमल, नितीन इंगोले, किरण जोगी, प्रतीक बोरळकर, दिगबर पुयड, मनीषा पाटील, संतोष दीपके, मोहिनी दीक्षित, कपिल जमधाडे, मुकेश डहाळे यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी यांनी उपस्थिती हाेती. फाेटाे नं. ०५