लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथे अभियांत्रिकी व औषध निर्माण प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा तीन सत्रात पार पडली. यात १२८ विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहे. ही परीक्षा एकूण १५ केंद्रांवर घेण्यात आली असून सुरळीतपणे पार पडली.यात एमएम, एमबी, एमबी या तीन प्रकारात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात पहिल्या सत्रात सकाळी १0 ते ११ या वेळेत चार केंद्रांवरून १४१९ पैकी १३२0 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यासाठीचे ९९ विद्यार्थी गैरहजर होते. तर १२.३0 ते २ या वेळेत १५ केंद्रांवरून ३५६९ पैकी ३४४१ विद्यार्थी हजर होते. तर ३.३0 ते ४.४0 या वेळेत ३२७१ पैकी ३0६८ जण हजर होते.
सीईटी सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 1:04 AM