लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याबाबत शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी संबंधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे सूचनाही दिल्या आहेत.यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाले. त्यातच उन्हाची वाढती तीव्रता व पाणीटंचाई लक्षात घेता १२ मार्चपासून शाळांना उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत शाळेची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी ८ ते दुपारी १ अशी राहणार आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार नियोजित अध्यापनाच्या तासात कोणताही बद्दल होणार नाही. या सूचनेनुसार अध्यापनाचे विषयनिहाय वेळापत्रक गट शिक्षणाधिकाऱ्यांनी निश्चित करावेत. त्याप्रमाणे शालेय कामकाज होईल याची क्षेत्रीय अधिकाºयामार्फत खात्री करून घेण्याच्याही सूचना आहेत. शासननिर्णय २९ एप्रिल २०११ नुसार प्राथमिक शिक्षकांनी शाळेबाहेरील चिंतन व अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी १५ तास व प्रत्यक्ष शाळेतील शिकविण्याचे किमान ३० तासांचा समावेश आहे. उन्हाची वाढती तीव्रता व पाणीटंचाईमुळे आता १२ मार्चपासून शाळांना उन्हाळी सुटी लागेपर्यंत शाळेच्या वेळापत्रकात बदल केला.
जिल्हा परिषद शाळेच्या वेळापत्रकात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:22 AM