हिंगोली : बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे लोकर्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ रोजी दुपारी झाले. यावेळी शिवप्रेमींच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता.यावेळी ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री दिलीप कांबळे, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणी नरवाडे, खा. अॅड. राजीव सातव, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. रामराव वडकुते, आ. डॉ. संतोष टारफे, आ.विक्रम काळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी खा. सूर्यकांता पाटील, माजी खा. अॅड. शिवाजी माने, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी आ.गजानन घुगे, अॅड. शिवाजी जाधव, जिल्हाधिकारी श्री. रूचेश जयवंशी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी.तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, बांधकाम पालिकेचे मुख्य अभियंता एस.एस. घुबडे, सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, मराठा महासंघाचे जावळे पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर, खंडेराव सरनाईक, त्र्यंबक लोंढे, मुख्याधिकारी रामदास पाटील, नगरसेवक जगजीतराज खुराणा, गणेश बांगर, नाना नायक, उमेश गुट्टे, अनिता सूर्यतळ, आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी फडणवीस म्हणाले, अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. सर्वांना सोबत घेवून अवघ्या १४ वर्षांचे असताना त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले. कुठलाही भेद न करता सुराज्य निर्माण केले. आमच्या स्वातंत्र्य, शौर्य व अस्मितेचे ते प्रतीक आहेत. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे काम शासनाकडून करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिल्पकार श्री.संताजी चौगुले, वास्तू विशारद चौधरी, कंत्राटदार नईम खान यांचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.सामान्यांतून कौतुकपुढाऱ्यांमध्ये असलेल्या राजकीय हेव्या-दाव्यांची तमा न बाळगता परिसरात जमलेले शिवप्रेमी मात्र कधी एकदा आपल्या लाडक्या राजाच्या पुतळ्याचे अनावरण होते अन् हा सोहळा डोळ्यात साठवता येईल, याच तंद्रीत होते. दुरून का होईना पण या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार झाल्याची भावना त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होती.एकच गर्दीअनावरणाचा कार्यक्रम संपल्यानंतर पुतळा पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. दूरवरून कार्यक्रम पाहणारे नंतर पुतळा पाहण्यात दंग झाले होते.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:59 AM
बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे लोकर्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ रोजी दुपारी झाले. यावेळी शिवप्रेमींच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता.
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी