सवना (जि. हिंगोली) : मुलगा नसल्याने सासरच्या मंडळींकडून होत छळाला कंटाळून येथील २६ वर्षीय महिलेने दोन मुलींना गळा दाबून मारल्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. आरती प्रवीण नायक (२६) हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी प्रवीण नागोराव नायक यांच्यासोबत झाला. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. १ मे रोजी संत बैरागी बाबा संस्थानमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले होते. नायक कुटुंबातील सर्वजण महाप्रसादाला गेले होते. ते घरी आल्यावर त्यांना आरतीने गळफास घेतलेला आढळले. पलंगावर पूर्वी (४) व किरण (२) या दोन्ही मुलींचा मृत अवस्थेत होत्या. आरती यांच्या माहेरच्या मंडळींना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र सोनवणे यांनी दिली. (वार्ताहर)
मुलगा नसलेल्या मातेने दोन मुलींसह जीवन संपविले
By admin | Published: May 03, 2017 3:15 AM