शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

बोगस कागदपत्रांवर विमा लाटणे वकील, पक्षकार अन् पोलिसाच्या अंगलट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 12:38 PM

मोटार अपघात झाला नसताना देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे संगनमत करुन खोटे दावे दाखल केल्याचे उघड

हिंगोली : बोगस कागदपत्रांच्या आधारे विमा लाटला जात असल्याच्या संशयावरून परभणी जिल्ह्यातील एका प्रकरणात उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) केलेल्या चौकशीत यात तथ्य आढळून आल्याने परभणी व हिंगोली जिल्ह्यातील वकील, पक्षकार, पंच व पोलीस कर्मचारी अशा दहा जणांवर गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

परभणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल मोटार अपघात दावा क्र.३१०, ३११,३१२,४२७ / २०१६ मध्ये उच्च न्यायालयाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मोटार अपघात झाला नसताना देखील बनावट कागदपत्रांच्या आधारे विम्याची रक्कम प्राप्त करुन घेण्यासाठी यातील आरोपींनी संगनमत करुन खोटे दावे न्यायालयात सादर केल्याचा संशय होता. या प्रकरणात गुन्हे अन्वेषण पथक हिंगोली मार्फत चौकशी झाली. तसेच परभणी जिल्ह्यातील चुडावा पोलीस ठाण्यात १८ रोजी विविध कलमान्वये गुन्हा नोंद झाला.

यात पूर्णा तालुक्यातील गौर येथील रोहिदास निवृत्तीराव जोगदंड व कैलास पंडितराव पारवे या दोन वकिलांसह पोलीस अंमलदार हरिभाऊ विश्वनाथ कदम यांच्यावरही गुन्हा नोंद झाला. वसमत तालुक्यातील गिरगाव येथील गंगाधर नामदेवराव पारवे, एकनाथ दत्ताजीराव कऱ्हाळे, अनिरुद्ध बापूजी कऱ्हाळे, पूर्णा तालुक्यातील गौर येथील शिवराज गंगाधर जोगदंड, जनार्दन नारायणराव जोगदंड, नवनाथ तात्याराव जोगदंड, आहेरवाडी येथील भरत दादाराव मोरे हे सात जण दावा दाखल करणारे व पंच म्हणून साक्ष देणारे सात जण ही आरोपींच्या यादीत आहेत.या दहा जणांना सीआयडीचे पोलीस अधीक्षक निकेश खाडमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक अरविंद कांबळे, पोनि दत्ताजीराव मोहिते, पोलीस अंमलदार चंद्रकांत पारटकर, दिनेश घुगे, चालक शिवाजी इंगोले, कुरेशी यांनी अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली