लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील १०१ ग्रामपंचायत अंतर्गत ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानांतर्गत ११ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या प्लास्टिक कचºयाच्या व्यवस्थापनावर भर देण्यासाठी अभियान राबविण्यात येणार असून यासाठी ग्रामपातळीवर निरीक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी जगदीश साहु यांनी दिली आहे.भारत सरकारने २ आॅक्टोबर रोजी संपुर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे निश्चित केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुचित केल्याप्र्रमाणे ‘स्वच्छता हिच सेवा’ हे अभियान राबविण्यासाठी निर्देश दिले आहेत. ग्रामपातळीवर प्लास्टिक कचºयाचे व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यात १०१ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका यांच्या सनियंत्रण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांनी समित्या स्थापन केल्यानंतर गावात गृृहभेटी, आंतरव्यक्तीसंवाद आदी मोहिम राबवावी अशी माहिती गावात प्रभावीपणे देण्यात आली. गावात असलेला कचरा, प्लास्टिक याचे विघटन करून हा जमा झालेला कचरा ग्रामपंचायत स्तरावर जमा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांना अभियानात सहभागी करून ‘स्वच्छता हिच सेवा’ विषयाची दिंडी काढण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ग्रामसभा, कलापथक आणि निगराणी समितीमार्फत जागृती करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामधुन ही मोहिम राबविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.ग्रामपंचायतीमध्ये जमा केलेला कचरा पंचायत समिती स्तरावर पाठविला जाणार असुन यासाठी पंचायत समिती येथे प्लास्टिक कचरा गोळा करण्यासाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आला आहे. या अनुषंगाने या मोहिमेंतर्गत संपुर्ण तालुका प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिक, पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी सहभागी होऊन तालुका प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी जगदीश साहु यांनी केले आहे.मोहिमेंतर्गत २ आॅक्टोबर रोजी स्वच्छ भारत दिवस साजरा केला जाणार असुन या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतीमधुन कचरा गोळा करण्यासाठी शपथ दिली जाणार आहे. तर ३ आॅक्टोबर ते २७ आॅक्टोबर दरम्यान जमा झालेल्या कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी याचा पुनर्वापर, सिमेंट कारखाने, औष्णिक विद्युत केंद्र व रस्ते बांधकामासाठी याचा वापर करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी प्लास्टिक कचºयाचे संकलन व वाहतुक करण्यासाठी खाजगी उद्योजकांची मदत या अभियानांतर्गत घेतली जाणार आहे. अशी माहितीही औंढा नागनाथ येथील गटविकास अधिकारी साहु यांनी दिली आहे.
‘स्वच्छता हीच सेवा’अभियान; १०१ समित्यांची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:04 PM