लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : भीमा कोरेगाव घटनेच्य निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्टÑ बंदच्या आवाहनाला वसमतमध्ये प्रतिसाद मिळाला. बुधवारी वसमत बाजारपेठ बंदच राहिली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर काही उपद्रविंनी गल्लीबोळात फिरुन दुचाकी, अॅटोला आगी लावल्या. शांतताभंग करण्याच्या हेतूने हा प्रकार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यात एकूण दहा लाखांचे नुकसान झाल्याची नोंद आहे.वसमत येथे भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी कडकडीत बंद पाळला होता. बुधवारी महाराष्टÑ बंदचे आवाहन झाल्यानंतर सकाळी बंदबाबत संभ्रम होता. थोडा वेळ काही व्यापाºयांनी दुकाने सुरू ठेवली मात्र बंदचे आवाहन करत कार्यकर्ते फिरल्याने पुन्हा दुकाने बंद राहिली. दिवसभर कडकडीत बंद राहिले. भारिप बहुजन महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देवून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.बंददरम्यान वसमत शहरात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कोणतीही अनुचित घटना दिवसभरात घडली नाही. डिवायएसपी शशिकिरण काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदयसिंह चंदेल यंनी चोख बंदोबस्त ठेवला.दहा लाखांचे केले नुकसानमंगळवारी रात्री शहरातील छोटा तलाब भागात काही उपद्रवीनी सोमवारपेठ भागात शेख कलीम शेख जानी यांच्या घरात असलेल्या मसाल्याच्या गोदामाला खिडकीतून आग लावली यात मसाल्याचे सर्व साहित्य जळून खाक झाले. सदाशिव पटवे यांच्या घरासमोर असलेल्या जुन्या टायरच्या ढिगाला आग लावली. यात पिंजºयात बंदिस्त असलेला पाळीव कुत्रा जळून मरण पावला. सय्यद हसन सय्यद खाजा यांच्या एमएच २० ए.सी. ३७४ या व शेख सलीम शेख नजीर यांच्या एमएच ३८- ३९७२ या आटोला आग लावली. शनिमंदिर परिसरासह विविध भागातील घरासमोर उभ्या असलेल्या पाच दुचाकी उपद्रवींनी पेटवून दिल्या.एकूण दहा लाखांचे नुकसान झाल्याची नोंद पोलिसांनी घेतली असून तपास फौजदार मोरे हे करत आहेत.जाळपोळीची घटना शांततेला बाधा उत्पन्न व्हावी, या उद्देशानेच काही जणांनी केली असावा, असा संशय पोनि चंदेल यांनी व्यक्त करून सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता जागरुक राहण्याचे आवाहन केले.
वसमतला दुसºया दिवशीही बंद व जाळपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:21 AM