आ. बाळापूर पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी ३१ डिसेंबर रोजी करण्यात आली. कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. चांगले कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पाठ थोपटली. पोलिसांच्या समाजातील वर्तनात आपुलकी असली पाहिजे, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. ठाणेदार रवी हुंडेकर, पोउपनि. अच्युत मुपडे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बाळापूर पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानाची दुर्दशा असल्याने अनेक पोलीस कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प वसाहतीतील काही रिकाम्या गाळ्यांची पाहणी केली. ते गाळे राहण्यायोग्य आहेत का? याची पाहणी केल्यानंतर काही पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी ही निवासस्थाने उपलब्ध करता येतील का? याबाबत चाचपणी सुरू आहे.
फाेटाे नं २३