जामगव्हाण येथे नागरिकांसाठी कोरोना लसीकरण शिबिर झाले. तर राजदरी, आमदरीत शिवसेना शाखा स्थापनेचा कार्यक्रम झाला. या वेळी जि.प. अध्यक्ष गनाजीराव बेले, जि.प. समाज कल्याण सभापती फकीरराव मुंढे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, जी.डी. मुळे, कौशल्याताई बेले, जसवंत काळे, साहेबराव देशमुख, कयूम शेख, श्याम महाराज, गंगाधर पोले, संतोष डुकरे, जयकुमार भगत, बालाजी धनवे, रावसाहेब पाटील, शेषराव मुकाडे, त्र्यंबकराव कल्याणकर, रावसाहेब लेकुळे, गजानन घुगे, माधव गोरे, प्रद्युम्न नागरे, वैभव इखे, बालाजी क्षीरसागर, शिवाजी भालेराव, शंकर शेळके, लक्ष्मण कराळे, बाबूराव पोले, निश्चय यंबल, माजी सरपंच गणपत ढाकरे, कुंडलीक बेले, पांडुरंग बेले, श्रीरंग बेले, भाऊराव कांबळे, गणेश बेले, गजराजी बेले, भीमराव ढाकरे, बालाजी पोटे, चिंतामण काळे, विठ्ठल काळे, बापूराव काळे, शेषराव बेले, शिवाजी कऱ्हाळे, शेकुराव कऱ्हाळे, बळीराम कऱ्हाळे, पांडुरंग कऱ्हाळे, रमेश रिठे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी बांगर यांनी सोनवाडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंतीसाठी १० लाख रुपये निधी, समाज मंदिरासाठी १७ लाख निधी, मौजे आमदरी येथे सीसी रोडसाठी १० लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली. तसेच नळ योजनेच्या प्रस्तावासाठीही पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
सोनवाडीत सभागृहाच्या कामाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:31 AM